शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

व्यक्तिगत शासकीय योजनांना परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:31 IST

पालांदूर : शासकीय विकास कामांना चालना देत, मऱ्हेगावला सुमारे ४० कोटी रुपयांची विविध कामे करीत गावकऱ्यांच्या अडचणींना न्याय देण्यात ...

पालांदूर : शासकीय विकास कामांना चालना देत, मऱ्हेगावला सुमारे ४० कोटी रुपयांची विविध कामे करीत गावकऱ्यांच्या अडचणींना न्याय देण्यात आला. त्याच धर्तीवर व्यक्तिगत शासकीय योजनांनाही परवानगी द्या, अशा आशयाचे निवेदन ग्रामपंचायत मऱ्हेगाव तालुका लाखनीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केले आहे.

घरकूल व गुरांचे गोठे बांधकामाला परवानगी नाकारल्याने, मंजूर असलेली घरकुले व गुरांचे गोठे प्रभावित झाल्याने, गावकरी संकटात सापडलेले आहेत. पुनर्वसनाचे कारण पुढे करीत, जुना मऱ्हेगाव येथील समस्त जनतेला व्यक्तिगत लाभाच्या योजनाना प्रतिबंधित करण्यात आले आहे.

सन २०११-१२ पासून ग्रामसभेच्या माध्यमातून सुमारे ७५ लाभार्थ्यांना घरकुलाकरिता निवड झालेली आहे, तर कित्येक शेतकऱ्यांना गुरांचे गोठे मंजूर आहेत. तालुका प्रशासकीय स्तरावर वारंवार या विषयाला हात लावूनही कुंभकर्णी झोपेत असलेले प्रशासन जागे न झाल्याने उपोषणाचे हत्यार उपसत नाईलाजाने जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारात हजेरी लावावी लागली.

शासनाने व प्रशासनाने पुनर्वसनाच्या अनुषंगाने निर्माण केलेला वादंगाचा विषय चुकीचा आहे. १९७८ला महापूर आल्यामुळे येथील ग्रामवाशी यांना १९८१ला कुटुंबप्रमुखाच्या नावे नवीन मरेगाव येथे ३०×५०चे भूखंड देण्यात आले होते. सदर प्लॉटचे पट्टे अजूनपर्यंत लाभार्थ्यांना मिळालेले नाही, तसेच त्यांना देण्यात आलेले दोन हजार रुपये व्याजासह शासनाने परत मागितले आहेत. मऱ्हेगाव/नवीन येथे आजही पुनर्वसित वस्ती या नात्याने परिपूर्ण सोईसुविधा उपलब्ध नाहीत. मऱ्हेगाव/जुना हे गाव जरी पूर पीडित असले, तरी शासनाने दिलेल्या नदी-नाल्यावरील पुलामुळे गावकऱ्यांना वाहतुकीसाठी मोठी सुविधा उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे आजही मऱ्हेगाव/जुन्याला सुमारे १,२०० एवढी लोकसंख्या असून, ८००च्या वर मतदार संख्या आहे. मऱ्हेगाव/जुना येथील जमीन सुपीक असल्याने व शेती कसण्याकरण्याकरिता स्थानिक ठिकाणीच राहणे अत्यंत आवश्यक असल्याने ग्रामवासी गाव सोडायला तयार नाहीत.

लोकप्रतिनिधींनी या विषयाला चालना देत मऱ्हेगाववासीयांना विविध योजनेंतर्गत विकास कामांना चालना दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत व्यक्तिगत लाभाच्या योजना बांधकामाची परवानगी द्यावी, अशी अपेक्षा निवेदनातून करण्यात आलेली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी सदर विषयाला ३१ मार्चपर्यंत न्याय न दिल्यास, १ एप्रिलला ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी राजीनामा देत, निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार टाकीत तहसील कार्यालय लाखनी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जाईल, असा सज्जड इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी सरपंच देवकन बेंदवार, आमदार राजू कारेमोरे तुमसर, सरपंच राघोजी फुल्लुके गुरुजी, माजी सरपंच श्यामा बेंदवार, सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम दुरुगकर आदी उपस्थित होते.