शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय रुग्णालयांतील सर्व शस्त्रक्रिया सुरू; थांबलेले उपचार पुन्हा सुरू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:22 IST

देवानंद नंदेश्वर भंडारा : कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून इतर आजारांच्या शस्त्रक्रियांकडे दुर्लक्ष झाले होते. भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, ...

देवानंद नंदेश्वर

भंडारा : कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून इतर आजारांच्या शस्त्रक्रियांकडे दुर्लक्ष झाले होते. भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, तुमसर व साकाेली येथील उपजिल्हा रुग्णालयात केवळ अत्यावश्यक शस्त्रक्रिया करण्यात येत होत्या. परंतु, इतर शस्त्रक्रियांकडे लक्ष दिले जात नव्हते. त्यांना तारीख पे तारीख दिली जात होती. परंतु, आता भंडारा जिल्ह्यात कोराेनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे इतर आजारांसाठी ही आरोग्य सेवा पूर्वपदावर आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आतापर्यंत हजारो रुग्णांनी उपचार घेतला आहे. इतर प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यास वेग आला आहे. कोरोनाच्या काळात दररोज ओपीडी ही २०० होती. परंतु, आजघडीला नेहमीप्रमाणे रुग्णसंख्या वाढत असून, ओपीडीची संख्या पाहता ५०० च्या घरात रुग्ण उपचारासाठी येत आहेत. कोरोना काळात रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, शस्त्रक्रियांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.

ओपीडीत होऊ लागली गर्दी

भंडारा जिल्ह्यात एकमेव असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालय, दाेन उपजिल्हा रुग्णालय, ३३ प्राथमिक आराेग्य केंद्र व सात ग्रामीण रुग्णालयांचा आढावा घेतला असता रुग्ण तपासणी नियमित हाेत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात तर ५०० च्या घरात रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. रुग्ण उपचारासाठी रुग्णालयाकडे धाव घेत आहेत.

कोणत्या रुग्णालयात कोणत्या शस्त्रक्रिया

जिल्हा सामान्य रुग्णालय : सर्व प्रकारच्या आजारांवर शस्त्रक्रिया करण्यात येतात. परंतु, तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भासत आहे.

उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे आजारांवर शस्त्रक्रिया करण्यात येतात. काही शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. आता सर्वच शस्त्रक्रिया होत आहेत.

ग्रामीण रुग्णालय : भंडारा जिल्ह्यातील सात ग्रामीण रुग्णालय व ३३ प्राथमिक आराेग्य केंद्रात रुग्णांची नियमित तपासणी केली जात आहे.

अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली आहे. शस्त्रक्रिया करण्याचा आता मुहूर्त निघाला. अनेक दिवसांपासून पोटाची शस्त्रक्रिया करायची होती. परंतु, कोरोनामुळे रुग्णालयात दाखल केले जात नव्हते. त्यामुळे माझी शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. डॉक्टरांनी आता तारीख दिली. त्यामुळे शस्त्रक्रियेसाठी मी रुग्णालयात दाखल झालो आहे.

महेश दुताेंडे, रुग्ण.

———————————————————————————————————————————-

गर्भाशय काढायचे असल्यामुळे रुग्णालयात दाखल झाले आहे. कोरोनाच्या वेळेस अनेकदा रुग्णालयात आल्यावरही डॉक्टरांनी परत पाठविले होते. परंतु, कोरोनाचा प्रभाव कमी होताच डॉक्टरांनी सांगितल्यानुसार रुग्णालयात दाखल झाले आहे.

- सरिता वाघमारे, रुग्ण

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आता सर्वच प्रकारच्या शस्त्रक्रिया रुग्णालयात होत आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी अजूनही कोरोना संपलेला नाही. त्यासाठी कोरोनासंदर्भात घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करून रुग्णांनी उपचार घ्यावा.

- डॉ. रियाज फारुखी, जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा.

गोरगरिबांवर कोरोना काळात उपचार झालेच नाही

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, तसेच उपजिल्हा रुग्णालय तुमसर व साकाेली येथील रुग्णालयात कोरोनाच्या काळात फक्त कोरोनाच्याच रुग्णांवर उपचार करण्यात आले व गर्भवतीची प्रसूती करण्यात आली. याशिवाय इतर कुठल्याही आजारावर उपचार करण्यात आले नाही. त्यामुळे गोरगरिबांनाही खासगी रुग्णालयांचे उंबरठे झिजवावे लागले. त्यात खासगी रुग्णालय चालकांकडून मोठ्या प्रमाणात लुबाडणूक करण्यात आली.