शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा येथे सारेकाही फुटपाथवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 21:29 IST

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आणि शहरातील कोणत्याही रस्त्याने गेले की व्यावसायिक अतिक्रमणांनी घातलेला विळखा निदर्शनास येतो. १५ हजार रुपयांपर्यंतच्या सोफासेटपासून ते महागड्या खेळण्यांपर्यंत सारेकाही फुटपाथवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

ठळक मुद्देअतिक्रमण विभागाचे अभय : कोण खातोय या अतिक्रमणांचा मलिदा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आणि शहरातील कोणत्याही रस्त्याने गेले की व्यावसायिक अतिक्रमणांनी घातलेला विळखा निदर्शनास येतो. १५ हजार रुपयांपर्यंतच्या सोफासेटपासून ते महागड्या खेळण्यांपर्यंत सारेकाही फुटपाथवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. एरव्ही पोटची खळगी भरण्यासाठी फुटपाथवर चहाची टपरी चालविणाऱ्याला पालिकेचा अतिक्रमण विभाग सुखाने जगू देत नाही. दुसरीकडे मात्र हजारो रुपयांचा माल रस्त्याच्या कडेला फुटपाथवर ठेवून उघडपणे विकला जात असताना अतिक्रमण विभागाचे याकडे लक्ष कसे जात नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.भंडारा शहरातील रस्ते अतिक्रमणमुक्त व्हावेत ,यासाठी जिल्हा प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेला काही प्रमाणात यश आले. मात्र, ही मोहीम आता बंद पङली आहे. सध्या शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर व्यावसायिक अतिक्रमणांचा बोलबाला आहे. बसस्थानक मार्गावर दुतर्फा विक्रेत्यांची गर्दी पाहायला मिळते. राष्ट्रीय महामार्गावर विश्रामभवनासमोर सोफासेट, आलमारी, टेबल, बांबूपासून तयार केलेले फर्निचर, चिनीमातीपासून तयार केलेल्या सजावटीच्या वस्तू, काचेचे झुंबर, गृहोपयोगी वस्तू सर्वकाही रस्त्याच्या कडेला विकले जात आहे. शोरूमपेक्षा काहीशी स्वस्त दरात या वस्तू मिळत असल्यामुळे ग्राहकही येथून खरेदी करीत आहेत.पहाटे ट्रकने येतो मालरस्त्याच्या कडेला लागलेल्या या दुकानांमध्ये महागड्या वस्तू विकल्या जातात. एक व्यक्ती २४ तास या दुकानात असते. ती रात्री या मालाजवळच फुटपाथवर झोपते. दिवसभरात विकलेल्या मालाचा मालकाला आढावा दिला जातो. त्यानंतर आवश्यक असलेला माल पहाटे ट्रकमध्ये टाकून विक्रीच्या ठिकाणापर्यंत पोहोचविण्याचा नित्यक्रम आहे.वाहतुकीचे तीनतेरारस्त्याच्या कडेला लागणाऱ्या या मोठमोठ्या दुकानांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. नागरिक या वस्तू पाहण्यासाठी, खरेदी करण्यासाठी रस्त्याच्या कडेला लागलेल्या या दुकानांमध्ये गर्दी करतात. स्वत:ची वाहने रस्त्यावर उभी करतात. यामुळे रस्त्याने जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्षरस्त्याच्या कडेला मोठमोठी दुकाने लावून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर वाहतूक पोलीस कारवाई करू शकतात. मात्र, वाहतूक पोलिसही याकडे लक्ष देताना दिसत नाहीत. पालिकेच्या अतिक्रमण विभागासह वाहतूक पोलिसही या अतिक्रमणांचा मलिदा खात नाही ना, असा संशय यानिमित्ताने येऊ लागला आहे.