शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कृषी केंद्रासाठी लाच मागणारे चौघे जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:50 IST

लाखनी तालुक्यातील मांगली गावात कृषी केंद्र सुरू करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पाच हजाराची लाच मागणाऱ्या चार जणांविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करून अटक केली. ही कारवाई सोमवारला दुपारी करण्यात आली.

ठळक मुद्देमांगली येथील प्रकार : सरपंच, ग्रामसेवकाचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लाखनी तालुक्यातील मांगली गावात कृषी केंद्र सुरू करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पाच हजाराची लाच मागणाऱ्या चार जणांविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करून अटक केली. ही कारवाई सोमवारला दुपारी करण्यात आली.अटक करण्यात आलेल्यांमध्ये सरपंच प्रशांत भैय्याजी मासूरकर (३६), ग्रामसेवक मेघा झलके (३०), सदस्य माधव अर्जुन वालदे (५२) व शिपाई राजकुमार उमराव वाघाडे (४४) यांचा समावेश आहे. तक्रारदाराला स्वत:च्या मांगली गावात रासायनिक खते, किटकनाशके व बियाणे विक्रीकरीता कृषी केंद्र सुरू करावयाचे होते. यासाठी त्यांनी मांगली ग्रामपंचायत कार्यालयात १८ एप्रिल रोजी नाहरकत प्रमाणपत्रासाठी रितसर अर्ज केला होता. मात्र हे प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामपंचायत कडून वारंवार टाळाटाळ केली जात होती. दरम्यान, शिपाई राजकुमार वाघाडे यांनी तक्रारदाराच्या मोठ्या भावाला भेटून नाहरकत प्रमाणपत्रासाठी पाच हजार रूपये लाचेची मागणी केली. ही बाब तक्रारदाराला कळल्यानंतर त्यांनी भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हा प्रकार सांगितला. त्यानंतर पथकाने शुक्रवार व शनिवारला सापळा पडताळणी केली. त्यावरून सोमवारला सापळा रचून शिपाई राजकुमार वाघाडे याला लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ अटक केली.याप्रकरणी सरपंच, ग्रामसेवक, सदस्य व शिपाईविरूद्ध पालांदूर पोलिसांनी गुन्हे नोंदवून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांनी चौघांना अटक केली आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक दिनकर सावरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, प्रतापराव भोसले, सहायक फौजदार गणेश पदवाड, शिपाई गौतम राऊत, सचिन हलमारे, अश्विनकुमार गोस्वामी, शेखर देशकर, कोमल बनकर, रसिका कंगाले, दिनेश धार्मिक यांनी केली.