शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरात एटीएम झाले ‘कॅशलेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:00 IST

बँकेत रांगा लागू नये व खातेदारांना चालती फिरती बँकेची सोय म्हणून एटीएम सुरू करण्यात आले, परंतु तुमसरात एटीएमसमोर कॅशलेशचा फलक बँकानी लावला आहे.

ठळक मुद्देखातेदारांना मन:स्ताप : एटीएममध्ये रोख रक्कम भरण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बँकेत रांगा लागू नये व खातेदारांना चालती फिरती बँकेची सोय म्हणून एटीएम सुरू करण्यात आले, परंतु तुमसरात एटीएमसमोर कॅशलेशचा फलक बँकानी लावला आहे. मागील दोन दिवसापासून एटीएममध्ये रोख रक्कमेचा ठणठणाट आहे. खातेदारांना येथे मन:स्ताप करावा लागत असून बँक प्रशासनाने किमान एटीएममध्ये रोख रक्कम भरावी, अशी मागणी केली जात आहे.मार्च अखेरची घाई सर्वांनाच असून आर्थिक वर्ष एप्रिलमध्ये सुरू होत आहे. सलग सुट्या आल्याने बँकेने तत्पूर्वी एटीएममध्ये रोख रक्कम भरली. खातेदारांनी मोठ्या संख्येने एटीएममधून रक्कम काढली. एक ते दीड दिवसात एटीएम रिकामे झाले. तुमसर शहरात सर्वच बँकाच्या एटीएम समोर कॅशलेशचा फलक लावण्यात आला आहे.बँकेला सुट्या असल्याने खातेदारांनी एटीएमचा वापर मोठ्या प्रमाणात केला. अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. आता बँक सुरू झाल्यावरच खातेदारांना रक्कम प्राप्त होईल, असे सध्या चित्र दिसत आहे.शहरात व्यावसायीक तथा नोकरदार वर्ग मोठ्या संख्येने आहे. सुट्या असल्याने खरेदी व फिरायला जाणे असा बेत अनेकांनी आखला होता. परंतु त्यांच्या आनंदावर येथे विरजन पडले आहे. बँकेने नियोजन करण्याची गरज असल्याचे खातेदारांनी सांगितले. तांत्रिक युगात तात्कळत राहावे लागत असेल तर यापेक्षा एटीएमचा वापर कशाला करावा, अशा संतप्त प्रतिक्रिया खातेदारांनी व्यक्त केल्या.मार्च अखेर असून बँकेचा व्यवहार बंद राहणार आहे, याची माहिती खातेदारांना होती. त्यामुळे वाजवीपेक्षा जास्त रक्कम खातेदारांनी काढली. याचा फटका दुसऱ्या खातेदारांना बसत आहे.-नितीन सोनकुसरे, व्यवस्थापक, बँक आॅफ बडोदा, शाखा तुमसर.