लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नागपूर येथे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील सात मुद्दयांचा आढावा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. याप्रसंगी सर्व यंत्रणांनी लवकरात लवकर सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी अधिकाऱ्यांना दिले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड, संदीप भस्के, नियोजन अधिकारी राजेश गायकवाड उपस्थित होते.नागनदीच्या पाण्यामुळे वैनगंगा नदीचे पाणी दुषित होऊन त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यवर होतो. त्यावर संबंधित यत्रणेने त्वरित कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. एनटीपीसी कडून प्रस्ताव मान्यतेची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी व पाण्याचे जलशुध्दीकरण प्रक्रिया त्वरित करावी, असे ते म्हणाले.अवैध रेती वाहतूकीस आळा घालण्यासाठी भरारी पथक नियुक्त केले असून यावर्षी चार कोटी ५३ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच चेकपोस्ट लावण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.पर्यटन धोरणांतर्गत वन विभागाने रावणवाडी व पवनी येथील पर्यटन सुविधा करण्याचे काम सुरु असल्याचे तसेच जलसंपदा विभागाने गोसीखुर्द पर्यटन क्षेत्रासाठी १०५ कोटींचा प्रस्ताव सादर केला असून मान्यता मिळताच कामाला सुरुवात करण्यात येईल, असे सांगण्यात आले.वैनगंगा नदीत वाढणारी जलपर्णी वनस्पती हा भंडारावासियांच्या जिव्हाळ्याचा विषय असून नागरिकांच्या आरोग्यास धोका होऊ शकतो, असे निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांनी सांगितले. यावर विचार करुन जिल्हा नियोजन समितीद्वारे निधी उपलब्ध होताच जलपर्णी वनस्पती निर्मूलनाचे काम करण्यात येणार आहे. तसेच पाणी शुध्दीकरणाचे कामही लवकरच करण्यात येईल.या बैठकीत नागनदीच्या दुषित पाण्यामुळे वैनंगगा नदीचे दुषित पाणी, राष्ट्रिय महामार्गावरील जमीनीचे भूसंपादन, बायपास मार्ग, अवैध रेती वाहतूक व सुलभ रेती वाहतूक, घरकुल, पर्यटन धोरण, महसूल, ग्रामविकास तसेच ग्रामस्तरावरील रिक्त पदे, वैनगंगा नदीत जलपर्णी वनस्पतीमुळे होणाºया परिणामाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्व यंत्रणांनी तातडीने अहवाल सादर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:01 IST
वैनगंगा नदीत वाढणारी जलपर्णी वनस्पती हा भंडारावासियांच्या जिव्हाळ्याचा विषय असून नागरिकांच्या आरोग्यास धोका होऊ शकतो, असे निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांनी सांगितले. यावर विचार करुन जिल्हा नियोजन समितीद्वारे निधी उपलब्ध होताच जलपर्णी वनस्पती निर्मूलनाचे काम करण्यात येणार आहे. तसेच पाणी शुध्दीकरणाचे कामही लवकरच करण्यात येईल.
सर्व यंत्रणांनी तातडीने अहवाल सादर करावा
ठळक मुद्देसंदीप कदम : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील सात मुद्यांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा