लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : भंडारा जिल्ह्याच्या सिमेगलगत असलेल्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी असल्यामुळे तळीरामांची जत्रा लाखांदूर शहरात भरत आहे. शहरातील बियरबार आणि देशी दारु दुकानांमध्ये गर्दी बघायला मिळत आहे. त्याहीपेक्षा अधिक देशी, विदेशी दारूचा पुरवठा लाखांदूर शहरातील परवानाधारक दुकानातून परजिल्ह्यामध्ये दिवस रात्र दारू माफिया हजारो पेट्यांची चारचाकी व दुचाकी वाहनाने तस्करी करीत आहेत.लाखांदूर शहरातील देशीदारू दुकान व विदेशी दारू दुकानातून अवैध दारू पुरवठा मोठ्या प्रमाणात गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात होत असून काही बियरबार मालकच देशी दारू माफियांना उपलब्ध करून देतात किंवा स्वत: पुरवठा करीत असतात.अवैध दारू वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाणात वाढले आहे. सुसाट वेगाने दारू माफिया गाडी चालवित आहे. त्यांचे नियंत्रण राहत नाही. यामुळे अनेक अपघात होत आहेत. या व्यवसायात प्रतिष्ठित व्यक्तींचे तरुण मुले व शासकीय नोकरदारांचे मुले तसेच हॉटेल व्यवसायीकदेखील यात आहेत. स्वत:च्या दुचाकी व चारचाकीने दारूची अवैध वाहतूक करीत असतात. कमी वेळामध्ये जास्त पैसा मिळत असल्याने अनेक महाशय या व्यवसायात गुंतले आहेत.याकडे लाखांदूर पोलीस दुर्लक्ष करीत असून कोणतीच कारवाई होत नाही. फिल्मी स्टाईलने माफिया वाहन चालवीत आहेत. शहरात दारू तस्करांचे मोठा रॅकेट असून लाखांदूरहून दारू वाहतूक पिंपळगाव, पुयार येथील जंगलमार्गे दारूची अवैध वाहतूक केली जात आहे. या वाहतुकीत पोलीस विभागातील काही कर्मचारी दारू माफियांना वरिष्ठ अधिकारी येत आहेत म्हणून माहितीदेखील देत आहेत. यामुळे दारू माफियांना सोयीचे होत आहे. सदर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून यामध्ये अनेक तरुण सहभागी झाले आहेत. याकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देऊन दारू तस्करांविरुध्द योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी लाखांदूर शहरातील नागरिक करीत आहे.
लाखांदुरातून परजिल्ह्यात दारूची तस्करी जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 06:00 IST
अवैध दारू वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाणात वाढले आहे. सुसाट वेगाने दारू माफिया गाडी चालवित आहे. त्यांचे नियंत्रण राहत नाही. यामुळे अनेक अपघात होत आहेत. या व्यवसायात प्रतिष्ठित व्यक्तींचे तरुण मुले व शासकीय नोकरदारांचे मुले तसेच हॉटेल व्यवसायीकदेखील यात आहेत. स्वत:च्या दुचाकी व चारचाकीने दारूची अवैध वाहतूक करीत असतात.
लाखांदुरातून परजिल्ह्यात दारूची तस्करी जोमात
ठळक मुद्देपोलिसांचे दुर्लक्ष : दारु दुकानदारांचे तस्करांना पाठबळ