शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

अल्लादिन वाघाची गोरेगाव तालुक्यात एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:24 IST

गोरेगाव : ताडोबातील अल्लादिन नामक वाघ भटकंती करत गोरेगाव तालुक्यातील वनपरिक्षेत्रात दाखल झाल्याची चर्चा सुरू होती. मात्र, मंगळवारी ...

गोरेगाव : ताडोबातील अल्लादिन नामक वाघ भटकंती करत गोरेगाव तालुक्यातील वनपरिक्षेत्रात दाखल झाल्याची चर्चा सुरू होती. मात्र, मंगळवारी (दि.१३) या वाघाचे तालुक्यातील कटंगी डॅम परिसरात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दर्शन झाले. त्यामुळे अल्लादिन वाघ या परिसरात वास्तव्यास असलेल्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.

नवेगावबांध व्याघ्र प्रकल्प व नागझिरा अभयारण्य गोरेगाव वन परिक्षेत्राला लागून आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. मागील तीन- चार दिवसांपासून ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वास्तव्यास असलेला अल्लादिन नामक वाघ या प्रकल्पातून गायब झाल्याची चर्चा होती. यानंतर वन्यजीव विभागाने ट्रॅकरच्या मदतीने या वाघाचा शोध सुरू केला होता. त्यानंतर हा वाघ गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यात दाखल झाल्याची माहिती होती. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती गोंदिया वन व वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे या दोन्ही विभागांच्या चमूने शोधकार्य सुरू केले होते. दरम्यान, हा वाघ तालुक्यातील कटंगी डॅम परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती आहे. वन व वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांना या वाघाचे दर्शनसुद्धा झाल्याची माहिती आहे. गोरेगाव वन परिक्षेत्रात पूर्वीच ६ वाघ वास्तव्यास होते. त्यातच आता ताडोबातील अल्लादिन वाघाची भर पडल्याने या परिसरातील वाघांची एकूण संख्या आता ७ वर पोहोचली आहे. ताडोबातील अल्लादिन नामक वाघ गोरेगाव वनपरिक्षेत्रात दाखल झाल्याचे वृत्त कळताच वन्यजीवप्रेमींचा या वाघाला पाहण्याचा उत्साह वाढला आहे, तर मागील काही दिवसांपासून या परिसरात वाघाने तीन- चारजणांवर हल्ला केला असल्याने परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.