शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

अक्षय तृतीयेला मिळतो पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा

By admin | Updated: April 27, 2017 00:33 IST

वैशाख शुध्द तृतीया म्हणजे अक्षय तृतीया होय. या दिवशी आपले पूर्वज आपल्या अवती-भोवती वास करतात.

नवीन कार्यारंभ : सोने-चांदीची खरेदी, श्राद्धाचा दिवस, पळस, मोहपानाच्या पत्रावळीत दिला जातो नैवेद्य

राजू बांते मोाहडीवैशाख शुध्द तृतीया म्हणजे अक्षय तृतीया होय. या दिवशी आपले पूर्वज आपल्या अवती-भोवती वास करतात. अक्षय तृतीयेला पितरांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला जातो. या दिवशी श्राध्द केल्याने आपण अल्पांशाने ऋणातून मुक्त होतो असे मानले जाते. अक्षय तृतीया म्हणजे ज्याचा अंत होत नाही असा. साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. वर्षभर कालगणनेमध्ये तिथींचा क्षय होत असतो. पण, वैशाख शुध्द तृतीया या तिथीचा कधीच ऱ्हास होत नाही. म्हणून ही अक्षय तृतीया समजली जाते. या दिवशी केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ न संपणारे मिळते असा समज आहे. या दिवशी नवीन संकल्प केला जातो. दानधर्म केला जातो. मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते. केलेले कार्य तथा वस्तूची खरेदी त्या अक्षय असतात असे म्हटले जाते. त्यामुळे हा दिवस महत्वपूर्ण मानला जातो.देव व पितरांजना उद्देशून जी काही कर्म केली जातात ती अविनाशी असतात. अक्षय असतात. या दिवशी केलेले दान, हवन कधी ही क्षयाला जात नसतात अशी समज आहे. या दिवशी आपले पूर्वज आपल्या सभोवती फिरत असतात. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पितरांचे स्मरण केले जाते. त्यांच्या प्रतिमेचे पूजनही केले जाते. या दिवशी मातीचे दोन माठ आनले जातात. त्यात वाळा टाकली जाते. त्या वाळयाने पाण्याला सुगंध येतो. पळसाच्या पानाच्या पत्रावळीवर व द्रोणात खीर, आंब्याचे पऱ्हे, पापड, कुरडया आदी वाढले जाते. सुगंधीत पाण्याने भरलेला घट दान केला जातो. काही परिवार पाण्याने भरलेल्या कलशाची पूजा करतात. या दोन कलशांना कर्हा व केली असे म्हटले जाते. ही दोन कलश पूर्वज माता पित्यांचे प्रतीके मानून त्याचे पूजन केले जाते. पुढे कैरी ठेवली जाते. खीर व इतर पदार्थाचा नैवेद्य दाखविला जातो. असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानले जाते. या दिवशी पितरांना उद्देशून अपिंडक श्राध्द करण्याची प्रथा रुढ आहे. हा दिवस अर्धा मुहूर्त मानतात. आपल्या पितरांमुळे आपण या जगात आहोत. श्राध्द केल्याने काही अंशी त्यांच्या ऋणातून मूक्त होता येतो असा समज आहे. आपल्या उन्नतीसाठी पितरांचे आशीर्वाद घ्यावेत म्हणूनच या दिवशी अपिंडक श्राध्द व तिलतर्पण केले जाते.या दिवशी अन्नपूर्णेचा जन्म झाल्याचे मानतात. खरे तर हा पूर्वजांचा आशीर्वाद मिळविण्याचा, दानधर्म करुन अक्षय पुण्य मिळविण्याचा अक्षय समृध्दी मिळविण्याचा दिवस, विविध धार्मिक कर्म, नवीन कार्याचा शुभारंभ, धन व संपत्तीच्या खरेदीतून साजरा केला जातो. या दिवशी मिळालेले सर्व काही अक्षय राहते यासाठी हीच या मागची लोकभावना दिसून येते. आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादासाठी अक्षय तृतीयेला पळस/ मोहपानाच्या पत्रावळीवर तयार केलेले सर्व अन्नाचे नैवैद्य ठेवतो. त्या नैवद्याला घराच्या छपरावर ठेवले जाते. आपल्या पूर्ववाच्या स्वरुपात येणारा कावळा त्या नैवैद्येला स्पशृ करतो. दोन घास खातो त्या कावळयाचा नैवैधलेला होणारा स्पर्श आशिर्वाद समजला जातो. पण अलीकडे ग्लोबल वार्मिगमुळे कावळयांची संख्या दुर्मिळ होत चालली आहे. अक्षय तृतीयेच्या नैवैद्याला कावळयाने शिवण्यासाठी अक्षरश: ताटकळत बसण्याशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही.अक्षय तृतीया शुभकार्यारंभाचा दिवस मानला जातो. या दिवशी लग्न केल्याने वैवाहिक जीवन समृध्दीकडे जाते असे मानतात. या दिवशी ग्रामीण व शहरी भागात अक्षय तृतीतेला लग्नाची रेलचेल बघायला मिळतो. महाराष्ट्र शिवाय छत्तीसगड, बंगाल, ओरीसा, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यात मोठया प्रमाणात अक्षय तृतीयेला विवाह संपन्न होतात.अक्षय तृतीतेला सोने, चांदी खरेदी होत असते. सोन्याची वाढलेली किंमत त्यामुळे खरेदी कमी होते. शेतकरी दुष्काळाचा छायेत असतात. त्यामुळे काही गरीब शेतकरी सोने खरेदीऐवजी चांदी झेपेल तेवढया किंमतीत खरेदी करतात.