शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सिहोरा ग्रामपंचायतवर आयटकचा मोर्चा

By admin | Updated: January 13, 2015 22:55 IST

ग्रामपंचायत सिहोरा येथे दोन कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्त्याची थकबाकी देण्यात आली नाही. या व अन्य मागण्यांच्या पुर्ततेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी

चुल्हाड (सिहोरा) : ग्रामपंचायत सिहोरा येथे दोन कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्त्याची थकबाकी देण्यात आली नाही. या व अन्य मागण्यांच्या पुर्ततेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना व आयटकच्या वतीने सिहोरा येथे मंगळवारला काढण्यात आला.ग्रामपंचायत सिहोरा येथे लिपीक पदावर माधोराव हेडाऊ आणि करवसुलक म्ळणून रामलाल बिसने सेवेत कार्यरत होते. एप्रिल २०१४ च्या कालावधीत हे दोन्ही कर्मचारी सेवानिवृत्त झाले. दरम्यान शासनाने २००७ पासून राहणीमानभत्ता लागू केला असताना सेवानिवृत्तीनंतर ग्रामपंचायत मार्फत भत्त्याची थकबाकी दोन्ही कर्मचाऱ्यांना दिली नाही. यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियावर उपासमारीची पाळी आली. राहणीमान भत्ता व अन्य भत्त्यावर थकबाकी प्राप्त करण्यासाठी दोन्ही कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतने जिल्हा परिषदपर्यंत पत्र व्यवहारातून धाव घेतली.अन्याय करण्यात येत असल्याने ग्रामपंचायत कर्मचारी संघटना व आयटकच्या वतीने ग्रामपंचायत भवन येथे शिवकुमार गणवीर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सिहोरा परिसरातील ग्रामपंचायतचे कर्मचारी सहभागी झाले होते. निवेदन सभापती कलाम शेख, सरपंच नेहा कुंभारे, नंदुरकर, ग्रामविकास अधिकारी एच.एम. पडोळे, सदस्य सलाम शेख, मनोज वासनिक, वनिता मसराम यांना देण्यात आले. या मोर्चात एस.बी. मोहारे, ओंकार शरणागत, मुरलीधर उरकुडे, भिमराव गजभिये, अन्नु कटरे, खेमराज शरणागत, छत्रशिल वाघाडे, रामदास कानतोडे, गयाराम चौधरी, भिमराव गजभिये, कवळू सातके, विजय बर्वे, राकेश गजभिये, गणेश आंबेडारे सहभागी झाले. (वार्ताहर)