शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत बँकांना तीन सलग सुट्ट्यांनी व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2022 21:43 IST

दिवाळीचा सण  उत्साही वातावरणात सगळीकडेच साजरा होत आहे. शहरात दररोजच खरेदीचा मुहूर्त असतो; मात्र ग्रामीण भागात वेळेवर येणाऱ्या पैशातून खरेदीचा मुहूर्त साधला जातो. कर्जमुक्ती प्रोत्साहन निधीची रक्कम गुरुवारी रात्रीपर्यंत जमा झाली. शुक्रवारी बँकेत तोबा गर्दी तयार झाली. रोखीचा सुद्धा तुटवडा भासला. त्यामुळे बऱ्याच खातेदारांना व शेतकरी लाभार्थ्यांना पैशाची उचल करता आली नाही.

मुखरू बागडेलोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : दिवाळीच्या आनंदीमय  सोहळ्यात बँकांना सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्याने गोरगरिबांसह शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.  शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी, संजय गांधी निराधार,  श्रावण बाळ  योजनेचे लाभार्थी व्यवहारासाठी अडचणीत आले. तरुणाई मात्र ऑनलाईन व्यवहार करीत दिवाळीची खरेदी करीत आहे. सुशिक्षित एटीएममधून पैसे काढून दिवाळीचा आनंद साजरा करीत आहेत. सर्वसामान्यांचे व्यवहार ठप्प पडले आहेत.दिवाळीचा सण  उत्साही वातावरणात सगळीकडेच साजरा होत आहे. शहरात दररोजच खरेदीचा मुहूर्त असतो; मात्र ग्रामीण भागात वेळेवर येणाऱ्या पैशातून खरेदीचा मुहूर्त साधला जातो. कर्जमुक्ती प्रोत्साहन निधीची रक्कम गुरुवारी रात्रीपर्यंत जमा झाली. शुक्रवारी बँकेत तोबा गर्दी तयार झाली. रोखीचा सुद्धा तुटवडा भासला. त्यामुळे बऱ्याच खातेदारांना व शेतकरी लाभार्थ्यांना पैशाची उचल करता आली नाही.संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे पैसे शुक्रवारी दुपारनंतर ऑनलाईन पद्धतीने खात्यात जमा झाले, असे तहसीलदार महेश शितोळे यांनी सांगितले. त्यामुळे लाभार्थ्यांना वेळेत माहिती झाली नाही. त्यामुळे पुढच्या तीन दिवसांच्या सुट्ट्यांनी गोरगरिबांची दिवाळी निराशेचीच ठरली. शासनाने व प्रशासनाने बँकिंग सुट्ट्यांचा अंदाज घेऊन पाच दिवसांपूर्वी आर्थिक नियोजन व्यवस्थित केले असते तर निश्चितच सर्वांची दिवाळी गोड झाली असती. मात्र आता वेळेवर खात्यात पैसे जमा झाल्याने धावपळ करावी लागत आहे.

मंगळवारी होणार तुफान गर्दी - २२ ऑक्टोबर रोजी चौथा शनिवार त्यामुळे बंद, २३ ऑक्टोंबरला रविवार नियोजित सुट्टी व सोमवारला लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने शासकीय सुट्टी आली. त्यामुळे सलग तीन दिवस बँका बंद आहेत. तीन दिवसांच्या सुट्ट्यानंतर २५ ऑक्टोबर बँक उघडणार. त्यामुळे बँकेत ग्राहकांची एकच गर्दी होणार आहे. शिक्षकांचे पगार, निराधारांचे मानधन, शेतकऱ्यांची प्रोत्साहन राशी व नियमितचे व्यवहारासाठी ग्राहकांची एकच झुंबड राहणार आहे.

रोखीची समस्या राहणार?एकाचवेळी खातेदारांना निधीची व्यवस्था करताना बँकांना जिकिरीचे होणार असल्याची शक्यता दाट आहे. एटीएमवर ग्राहकांची गर्दी वाढलेली आहे. तर काही व्यवहार एकमेकांकडून तात्पुरत्या स्वरूपात उसनवार घेत तात्पुरती गरज भागवली जात आहे.

 

टॅग्स :bankबँक