शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कारखाना परिसरातील शेतजमीन निकामी

By admin | Updated: January 17, 2017 00:22 IST

एमआयडीसी राजेगाव (गडेगाव) येथे असलेल्या वरम बायो एनर्जी कारखान्यातील केमिकलयुक्त सांडपाणी व धूळ प्रदुषणाचे कण शेतामध्ये शिरत असल्याने शेतजमीन निकामी झालेली आहे.

शेतकरी संकटात : प्रकरण वरमबायो एनर्जी कारखान्याचेभंडारा : एमआयडीसी राजेगाव (गडेगाव) येथे असलेल्या वरम बायो एनर्जी कारखान्यातील केमिकलयुक्त सांडपाणी व धूळ प्रदुषणाचे कण शेतामध्ये शिरत असल्याने शेतजमीन निकामी झालेली आहे. शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून न्याय मिळावा, यासाठी शेतकरी जिल्हा प्रशासनाकडे धावाधाव घेत आहे. वरम बायो एनर्जी कारखान्यालगत राजेगाववासीयांची शेकडो एकर शेती आहे. हा कारखाना २००८ पासून सुरु करण्यात आला. येथून केमीकलयुक्त सांडपाणी व धुळीचे कण शेतकऱ्यांच्या शेतात येत आहे. त्यामुळे २००८ मध्ये शेतकऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनाची भेट घेऊन समस्या सोडविण्याची मागणी केली. त्यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियमन मंडळ व जिल्हा प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आली. तेव्हा कारखाना व्यवस्थापनाने सांडपाणी येणे बंद केले होते. मात्र त्यानंतर आजपर्यंत कारखान्यातील धूळ प्रदूषण व सांडपाणी शेतात येत आहे. राजेगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेती कारखान्यालगत असून या शेतीच्या माध्यमातून ते उदरनिर्वाह करीत होते. पावसाळ्यात धानाचे पिक घेतले जाते. त्यानंतर रब्बी पिक, हरभरा, गहू, पोपट, उडीद, मुग आदी पिके घेतली जातात. परंतु कारखाना आरंभ झाला तेव्हापासून प्रदूषणामुळे पिके नष्ट होत आहेत. कर्ज काढून दरवर्षी शेती कसली जात आहे. कारखान्यातील पाण्यामुळे उत्पादन होत नाही. प्रदूषण व सांडपाण्यामुळे पिके जळत आहेत. दुषित पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी कारखान्याच्या आवारात शोषखड्डा तयार केलेला नाही. हेतूपुरस्सर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दूषित पाण्याचा प्रवाह सुरु आहे. तक्रार करूनही अधिकारी व व्यवस्थापनाने मोका तपासणी केलेली नाही.असे सतत सुरु असले तर शेतजमिन निकामी होत आहे. जिल्हा प्रशासनाने व प्रदूषण मंडळाने कारखाना व्यवस्थापनाला सांडपाण्याची विल्हेवाट लावून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये अशी उपाययोजना करण्याची गरज आहे. यापूर्वी सन २००९ मध्ये प्रदूषण मंडळाचे अधिकाऱ्यांनी भेट देऊन चौकशी अहवाल तयार केला होता. त्यानंतरही कारखान्याने सांडपाणी शेतीमध्ये जाणे बंद केले नाही. जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पिकाचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी कायमचा उपाय शोधावा. नुकसानभरपाईपोटी शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राजेगाव परीसरातील नागरिकांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)प्रदूषणामुळे धोकावरम बायो कारखान्यात धानाच्या कोंड्यापासून विज निर्मिती करण्यात येते. यामुळे धूर प्रदूषण वाढले आहे. कर्णकर्कश आवाजामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाली आहे. कारखान्यातील धूर कांडीतून (चिमनी) मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्यामुळे परिसरात आवागमन करणाऱ्या अनेकांना डोळ्यांचा आजार बळावला आहे. याकडे प्रदुषण विभागाने लक्ष द्यावे.