शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंपांची शेतकऱ्यांकडे ४९ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:48 IST

साकोली उपविभागातील १८ हजार ५८१ कृषीपंपधारकांकडे तब्बल ४८ कोटी ९९ लाख ७२ हजार ३३७ रुपये थकबाकी आहे. गत तीन वर्षांपासून या थकबाकीवर शासनाकडून कोणतीच दखल घेण्यात आली नाही. उलट या थकबाकीवर व्याज मात्र वाढत चालले आहे.

ठळक मुद्देसाकोली उपविभाग : १८ हजार ५०० पंपधारक

शिवशंकर बावनकुळे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : साकोली उपविभागातील १८ हजार ५८१ कृषीपंपधारकांकडे तब्बल ४८ कोटी ९९ लाख ७२ हजार ३३७ रुपये थकबाकी आहे. गत तीन वर्षांपासून या थकबाकीवर शासनाकडून कोणतीच दखल घेण्यात आली नाही. उलट या थकबाकीवर व्याज मात्र वाढत चालले आहे.साकोली उपविभागात लाखनी, लाखांदूर आणि साकोली या तीन तालुक्यांचा समावेश होतो. साकोली तालुक्यात सहा हजार २३२ कृषीपंप धारक आहेत. त्यांच्याकडे १६ कोटी १९ लाख २१ हजार २९८ रुपये थकबाकी आहे. लाखनी तालुक्यात सहा हजार २६६ कृषीपंप धारक असून त्यांच्याकडे १५ कोटी ९० लाख ७९ हजार ४२५ रुपये थकबाकी आहे तर लाखांदूर तालुक्यात ६ हजार ८३ कृषीपंपधारक असून त्यांच्याकडे १६ कोटी ८९ लाख ७० हजार ९१४ रुपये थकबाकी आहे. या तीन्ही तालुक्यातील थकबाकी सुमारे ४९ कोटींची आहे.निसर्गाचा लहरीपणा, सततची नापिकी आणि वीज वितरण कंपनीने केलेल्या भरमसाठ दरवाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शासनदरबारी शेतकºयांची वीज जोडणी कापायची नाही असे धोरण आहे. त्यातच कृषीपंप धारकांना शासन विजेचे बिल माफ करेल या आशेवर अनेक शेतकºयांनी बिलच भरले नाही. ही थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. एका उपविभागाची एवढी थकबाकी आहे तर जिल्ह्याची ५०० कोटीच्या वर असण्याची शक्यता आहे.सद्यस्थितीत धान उत्पादक शेतकरी सर्वच स्तरात दुर्लक्षित ठरत आहे. उत्पादनाच्या तुलनेत बाजारभाव मिळत नाही. शेतकºयांची स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. अशा स्थितीत कृषिपंपाची थकबाकी वाढत आहे. याबाबत शासनाने उपाययोजना करावी आणि शेतकºयांचे बिल माफ करावे अशी मागणी आहे.कृषीपंपधारक विजेचे बिल भरत नाही. त्यामुळे थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. कृषीपंपधारक शेतकरी बिल का भरत नाही हे मात्र निश्चित सांगता येणार नाही.-अनिल गेडाम, कार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी, साकोली.

टॅग्स :agricultureशेती