शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सहायकांचे आंदोलन

By admin | Updated: August 11, 2014 23:44 IST

राज्य कृषी विभागातील महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाच्या वतीने त्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून राज्यभरात आंदोलन सुरू केले आहे. यात भंडारा जिल्ह्यातील १६५ कृषी सहायक

भंडारा : राज्य कृषी विभागातील महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाच्या वतीने त्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून राज्यभरात आंदोलन सुरू केले आहे. यात भंडारा जिल्ह्यातील १६५ कृषी सहायक सहभागी झाल्याने ऐन शेतीच्या हंगामात आंदोलन सुरू झाल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकण्याची चिन्ह दिसत आहे.महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ पुणेच्या माध्यमातून कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांच्या मागण्यांच्या संदर्भात मागील काही दिवसांपासून आंदोलने तथा निविदांच्या माध्यमातून सरकारला मागण्या सादर करण्यात येत आहे. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. कॅडर्र संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाने या मागण्या पूर्ण करण्याच्या संदर्भात सोमवारपासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात कृषी विभागातील तांत्रिक संवर्ग कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी, महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग २, महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग १, अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी सहसंचालक, कृषी संचालक या संवर्गातील कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील वेतन श्रेणी व दर्जावाढीबाबत मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, कृषी विभागातील काही योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण करण्यासाठी घेतलेला निर्णय रद्द करावा, नैसर्गीक आपतकालीन परिस्थितीत शेतपिकाचे नुकसान झाल्यास त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी सहकार विभागाच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, यासह १३ मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.यात भंडारा जिल्ह्यात कार्यरत १६५ कृषी सहायकांनी सहभाग घेतला आहे. सात दिवसात राज्य शासनाने मागण्यांच्या संदर्भात तोडगा काढला नाही तर बेमुदत संप व त्यानंतर मुंबई येथे आम उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाने दिला आहे. दरम्यान ऐन पावसाळ्यात शेतीचा खरीप हंगाम सुरू आहे. या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून नेहमी मदत मिळते. त्यांच्या या आंदोलनाने शेतकऱ्यांना मदत किंवा शेतीविषयक माहिती मिळणार नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. (शहर प्रतिनिधी)