शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

कृषि महोत्सवाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 23:34 IST

कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १४ मार्च दरम्यान आयोजित वैनगंगा कृषि महोत्सवाचा समारोप कृषि विभागांतर्गत प्रगतीशिल शेतकरी, पशुसंवर्धन विभागांतर्गत शेतकरी, शेती निष्ठ शेतकरी यांचा सत्कार तसेच महोत्सवात स्टॉल लावलेल्या शासकीय, अर्धशासकीय, निविष्ठा गट यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा गौरव : एफपीओ गटात नवचैतन्य शेतकरी उत्पादक कंपनी धारगाव अव्वल

आॅनलाईन लोकमतभंडारा : कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १४ मार्च दरम्यान आयोजित वैनगंगा कृषि महोत्सवाचा समारोप कृषि विभागांतर्गत प्रगतीशिल शेतकरी, पशुसंवर्धन विभागांतर्गत शेतकरी, शेती निष्ठ शेतकरी यांचा सत्कार तसेच महोत्सवात स्टॉल लावलेल्या शासकीय, अर्धशासकीय, निविष्ठा गट यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाबिजचे व्यवस्थापक मानकर, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नितीन फुके, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी काशीनाथ तर्कसे, प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा मंजूषा ठवकर, उपविभागीय कृषि अधिकारी एस. पी. लोखंडे, पदमा्कर गिदमारे, तांत्रिक अधिकारी विजय रायसिंग उपस्थित होते.कृषि प्रदर्शन, उत्पादक ते थेट ग्राहक विक्री, परिसंवाद चर्चासत्र, शेतकरी सन्मान समारंभ, महिला बचत गट निर्मित वस्तुंचे प्रदर्शन व विक्री आणि सांस्कृतिक कार्यक्रम ही महोत्सवाची वैशिष्टये ठरली. १९९९ चे शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त प्रकाश दुर्गे यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कृषि विभागांतर्गत प्रगतीशिल शेतकरी सुनिता गभणे पलाडी, श्रीराम मारवाडे बेटाळा, कमला गभणे, खरबी, अतुल गभणे अडयाळ, छाया गायधने मुंडीपार, सुनंदा मदनकर खोलमारा, संजय झलके कनेरी/दगडी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पशुसंवर्धन विभागांतर्गत शेतकरी दिलीप कायते गुंथारा, नटराज फुले वासेरा, प्रमोद पटले देवरीदेव, शारदा ब्राम्हणकर बोरगाव, महादेव बोरकर निलज, पुष्पा कांबळे बोथली, दुर्योधन शेंडे चिचटोला यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.स्टॉल लावलेल्या शासकीय गटात प्रथम पुरस्कार जिल्हा रेशीम कार्यालय भंडारा यांना तर द्वितीय पुरस्कार कृषि विज्ञान केंद्र साकोली यांना देण्यात आला. तृतीय पुरस्कार जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग व कृषि संशोधन केंद्र साकोली यांना देण्यात आला. अर्धशासकीय गटात ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा यांना प्रथम पुरस्कार तर, भंडारा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ यांना द्वितीय पुरस्कार देण्यात आला. तृतीय पुरस्कार कृपान शेती सेवालय गोंदिया व केडीया आॅटो यांना देण्यात आला. निविष्ठा गटात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ भंडारा यांना प्रथम तर धरती अ‍ॅग्रो केमीकल्स नागपूर यांना द्वितीय पुरस्कार देण्यात आला. न्यूजीविडू सिड्स व योगेश इरीगेशन (नेटाफीम) यांना तृतीय पुरस्कार देण्यात आला.एफपीओ गटात नवचैतन्य शेतकरी उत्पादक कंपनी धारगाव यांनी प्रथम तर, गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनी गणेशपूर यांनी द्वितीय पुरस्कार देण्यात आला. तृतीय पुरस्कार लोकमानस व फेडर दाल मिल मंडणगाव यांना देण्यात आला. महिला बचत गटात वैष्णवी महिला बचत गट कुरमुडा यांना प्रथम तर एकता महिला बचत गट यांना द्वितीय पुरस्कार मिळाला. तृतीय पुरस्कार दूर्गा महिला बचत गट आंधळगाव यांना देण्यात आला. उपस्थितांचे आभार पदमाकर गिदमारे यांनी केले. यावेळी शेतकरी, महिला बचत गटाच्या सदस्य, नागरिक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.