शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सहाय्यकांचे आंदोलन

By admin | Updated: June 20, 2017 00:19 IST

राज्य शासनाने स्वतंत्र मृद व जलसंधारण विभाग स्थापन केला आहे. यामुळे कृषी सहायकांवर मोठा अन्याय होणार आहे.

विविध मागण्या : जिल्हा कृषी अधीक्षकांना दिले निवेदन लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य शासनाने स्वतंत्र मृद व जलसंधारण विभाग स्थापन केला आहे. यामुळे कृषी सहायकांवर मोठा अन्याय होणार आहे. तो होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सुमारे १३० कृषी सहायकांनी आंदोलन सुरु केले आहे. स्वतंत्र मृद व जलसंधारण विभागाचे स्थापना करुन कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध काय असेल याबाबद अद्यापही कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. मृद व जलसंधारण विभागाने कृषी सहायकास पदोन्नतीने मिळणाऱ्या पर्यवेक्षकाची सर्वच पदे आपल्याकडे घेतली आहे. त्यामुळे भविष्यात कृषी सहायकांना पदोन्नतीचे पद राहणार नाही. सोबत कृषी विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे ही पदे मृद व जलसंधारण विभागाकडे मर्ग केल्याने कर्मचाऱ्यावर अन्याय होणार आहे.याबाबींचा विचार करुन कृषी विभागाची सुधारित आकृतीबंध तयार करणे गरजेचे आहे. मात्र ते करण्यास प्रशासनाने पुढाकार अद्याप घेतलेला नाही. या मागणीसह कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तातडीने तयार करावा. या आकृतीबंधमध्ये कृषी सहायकांचे पदनाम सहायक कृषी अधिकारी असे करावे, कृषी पर्यवेक्षकांची पदे कृषी सहायकांमधून पदोन्नतीने भरावी, कृषी सेवक पदाचा तीन वर्षाचा कालावधी हा शिक्षण सेवकांप्रमाणे आश्वासीत प्रगती योजना इतर सर्व लाभांसाठी ग्राह्य धरण्यात यावे. यासह अन्य मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या वतीने १२ जूनपासून विविध प्रकारचे आंदोलन करुन शासनाच्या निदर्शनात आणून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासंदर्भात सोमवारला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे व निदर्शने करण्यात आली. यात जिल्ह्यातील सुमारे १३० कृषी सहायक सहभागी झाले होते. कृषी सहायकांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील जलसंधारणाची कामे खोळंबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आंदोलन कर्त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी शिष्टमंडळात आनंद मोहतुरे, गिरीश रणदिवे, गोपाल मेश्राम, भगरित सपाटे, श्रीकांत सपाटे, राजेंद्र खंडीईत, भास्कर सोनवाने, प्रशांत भोयर आदींचा समावेश होता.