शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
4
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
5
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
6
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
7
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
8
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
9
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
10
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

वर्षभरानंतर खाद्यतेल झाले स्वस्त; आता खुशाल खा चमचमीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:25 IST

खाद्य तेलाच्या किमती सरकारने सर्वसामान्यांसाठी कमी कराव्यात, अशी मागणी केली जात होती. सर्वाधिक दर असलेल्‍या शेंगदाणा तेलाच्या किमती ...

खाद्य तेलाच्या किमती सरकारने सर्वसामान्यांसाठी कमी कराव्यात, अशी मागणी केली जात होती. सर्वाधिक दर असलेल्‍या शेंगदाणा तेलाच्या किमती २०० वरून १८० तर सूर्यफूल तेलाचे दर १९० वरून १८० वर आले आहेत. सोयाबीन तेल १७० वरून १५० वर, पाम तेल १५० वरून १४० वर, सरसु तेल २०० वरून १८० वर आले आहे. सोयाबीन तेलाच्या किमतीत सर्वाधिक घट झाली आहे. गत तीन-चार महिन्यांपासून खाद्यतेलाच्या भावाने उच्चांक गाठला होता. याची झळ गोरगरिबांना बसत होती. आता सोयाबीन तेल तब्बल १७० वरून १५० रुपये किलोवर पोहोचल्याने किंचीत दिलासा मिळाला आहे. होलसेलने जवळपास यापेक्षा काही रुपयांची सवलत मिळत आहे. यापूर्वी १५ किलोच्या डब्यासाठी २३०० ते २४०० रुपये मोजावे लागत होते. एवढे महागीचे तेल घेणे सर्वसामान्य नागरिकांना परवडत नव्हते. त्यामुळे संसाराचा जेमतेम खर्च भागवित असताना एवढ्या महागीचे तेल खायचे कसे? असा प्रश्न सर्वसामान्य मजूरवर्गाला पडत होता. आता काहीसा दिलासा मिळणार आहे.

बॉक्स

गृहिणींचे बजेट कोलमडले

महिला वर्गाला रोजच्या स्वयंपाकासाठी खाद्यतेलाची नितांत गरज असते. त्याशिवाय स्वयंपाक होऊच शकत नाही. तथापि, गेल्या चार-पाच महिन्याअगोदर तेलाचे भाव शंभर रुपये किलोच्या आतच होते; मात्र आता अचानक जवळपास दोन ते तीन महिन्यांपासून तेलाने भावात एकदम मोठी वाढ झाल्याने महिलांना खाद्यतेलाअभावी स्वयंपाक करणे कठीण बनले आहे. स्वयंपाकगृहातील आर्थिक गणित पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. भाववाढीचे रडगाणे कोणालाच सोसवेना झाले आहे. खाद्यतेलाचा साठा करीत ठोक खाद्यतेल विक्रेते चढ्या दराने तेलाची विक्री करीत असल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य नागरिकांची मोठी आर्थिक लूट होत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. तेलाचे दर वाढले सतानाही लोकप्रतिनिधी मात्र गप्प का? असा प्रश्‍नही सर्वसामान्य गृहिणींमधून विचारला जात आहे.

कोट

आमच्या वडिलांच्या काळातही चांगले तेल घाण्यावरून मिळायचे; मात्र आता दुकानात एवढे महागाईचे तेल घेऊनही त्याची गुणवत्ता चांगली नाही. याशिवाय प्रचंड दरवाढ व जिल्ह्यात वन्य प्राण्याचा असलेला त्रास यामुळे सूर्यफूल, भुईमूगसारखी पिके आम्हाला वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे घेता येत नाहीत.

दीपक गिर्हेपुंजे, शेतकरी, खरबी नाका.

कोट

सूर्यफूल तेलाचा दर जानेवारी २०२१ च्या दुसऱ्या आठवड्यात प्रतिकिलो १४० होता. तर सध्या एक किलो सूर्यफूल तेलासाठी ग्राहकांना १८५ रुपये मोजावे लागत आहेत. हीच अवस्था शेंगदाणा तेलाची आहे. खाद्यतेलाचे दर इतके वाढले आहेत, त्या तुलनेत बळीराजाच्या शेतमालाला मात्र तेवढा सरकार भाव देत नाही.

धनराज आकरे, शेतकरी, खरबी नाका.