शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

महिनाभरानंतर मिरची, वांग्याचे भाव पुन्हा सावरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:44 IST

शेतकरी सुखावला : ढगाळ वातावरणाचा परिणाम. पालांदूर : डिसेंबर महिन्याचे आरंभापासून भाजीपाल्याचे दर सुमार घसरलेले होते. यामुळे शेतकरी वर्गाचा ...

शेतकरी सुखावला : ढगाळ वातावरणाचा परिणाम.

पालांदूर : डिसेंबर महिन्याचे आरंभापासून भाजीपाल्याचे दर सुमार घसरलेले होते. यामुळे शेतकरी वर्गाचा बाजारात नेण्याचा खर्चसुद्धा निघणे कठीण होता. परंतु गत आठ दिवसाच्या ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्याची आवकवर परिणाम झाल्याने व मागणी कायम असल्याने वांगे व मिरची च्या दरात बर्‍यापैकी भाव वाढ झालेली आहे.

पालांदूर मंडल कृषी कार्यालयांतर्गत १६६ हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड केलेली आहे. चुलबंद खोऱ्यातील शेतकरी शेतीत सर्वच पीक घेतात. सुमारे २०० हेक्‍टर पर्यंत मक्याची लागवड नियोजित आहे. ११९० हेक्टर उन्हाळी धानाचा हंगाम आहे. तर काही हेक्टरवर कडधान्याची लागवड आटोपलेली आहे. खरिपाचा हंगाम शेवटच्या टोकाला असून मळणी संपल्या सारखीच आहे. मात्र धान खरेदी केंद्रावर धान विक्रीच्या दीर्घ प्रतीक्षेत आहेत. प्रत्येक धान खरेदी केंद्रावर त्याच्या कार्यक्षमतेने नुसार सुमारे २० हजार क्विंटल पर्यंत धानाची खरेदी आटोपलेली आहे. पहिल्या टप्प्यातील धानाचा निधी आला असून दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा कायम आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत धान मोजणी चा अंतिम मुहूर्त ठरलेला आहे. यातून सुटका मिळावी व दररोज नगदी रुपये हातात यावे या दूरदृष्टीने चुलबंद खोऱ्यातील शेतकरी सुमार प्रगतीवर आहे. बागायती शेतीत वांगे ,मिरची यांचे दर बऱ्यापैकी सरसावलेले आहेत. शनिवारी आठवडी बाजारात वांगे चिल्लर भावात चाळीस रुपये किलोच्या दराने तर मिरची ४० ते ५० रुपये दराने विकल्या गेली. हा दर कायम राहिल्यास बागायतदारांना अधिक नफ्याची आशा देणारा ठरणार आहे.

मिरची चा व्यापारी हा सुद्धा हायटेक झाला आहे. बीटीबी मुळे व्यापारी वर्गात खरेदी करता स्पर्धा तयार झाली असून यामुळे शेतकरी वर्गाला निश्चितच फायदा होत आहे. भाजीपाल्यात सुमार प्रगती साधली आहे. कृषी विभागाने पुरविलेल्या टिंबक व मल्चिंगचे अद्यावत ज्ञान व त्यात शेतकऱ्यांना मिळालेले अनुदान हेसुद्धा भाजीपाल्याच्या उत्पादनाकरिता प्रेरक ठरलेले आहेत.

बॉक्स

लाखांदूर तालुक्यातील चुलबंद काठावरील पालांदूर शेजारील खोलमारा या गावात प्रत्येक घरात भाजीपाल्याची शेती होत आहे. कारले व चवळा (शेंग)यांचे उत्पादन अख्ख्या जिल्ह्यात परिचित आहेत. गावचे सरपंच अमृत मदनकर यांनी गावाला योग्य दिशा देत घराघरात प्रगतशील शेतकरी तयार केलेला आहे. पालांदूर येथे बारमाही भाजी उत्पादक देवराम तलमले, मोहन लांजेवार, धनपाल नदुरकर, प्रकाश नंदुरकर, रमाबाई लांजेवार, सुखदेव भुसारी, विश्वास राऊत, रीना राऊत, सतीश भुसारी, मनोहर भुसारी, धनश्याम लांजेवार, हेमराज भुसारी, अभिमान भुसारी, टिकाराम भुसारी, गजानन भुसारी, अरुण पडोळे, प्रशांत खागर आदी शेतकरी पालांदूरला ताजा भाजीपाला पुरवतात. यांच्या सेवेत पालांदूर येथील कृषी मित्र शरद निखाडे, प्रशांत जांभुळकर, गजानन हटवार,नरेंद्र खंडाईत व मंडळ कृषी कार्यालय नेहमी तत्पर असतात.

कोट बॉक्स

पांढरा वांगा उत्पादित असून त्याला प्रति किलोला ४० रुपयेचा प्रति किलो दर शनिवारी आठवडी बाजारात मिळालेला आहे. पांढरा वांगा ला खूप मोठी मागणी आहे. पांढरा वांगा ही पालांदूरची भाजीपाल्याची जुनी ओळख आजही कायम आहे.

सतिश भुसारी, बागायतदार पालांदुर.