शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
3
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
4
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
5
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
6
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
7
Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर?
8
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
9
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!
10
पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या, पण..; जम्मू-काश्मीरमधून PM मोदींचा पाकला इशारा
11
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
12
रेपो रेटचा डबल धमाका! व्याजापोटीचे १.४८ लाख वाचणार, त्यातून ईलेक्ट्रीक स्कूटर घेतली तर आणखी... 
13
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
14
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
15
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
16
Video : गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत होता नवरा, अचानक झाली बायकोची एन्ट्री! पुढे काय झालं बघाच
17
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
18
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम
19
"तो बागेत फिरायला गेलाय"... रोहित शर्मासंदर्भातील प्रश्न अन् पंतला आठवला हिटमॅनचा फेमस डायलॉग
20
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका

लॉकडाऊननंतर आठवडी बाजार पटाच्या मैदानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 05:01 IST

अनेक वर्षापासून साकोलीचा आठवडी बाजार महामार्गाच्या दोन्ही बाजूला व एकोडी रोडच्या दोन्ही बाजूला भरत आहे. बाजाराच्या दिवशी येथील वाहतूक अडचणीची होत होती. तर बरेच अपघातही घडले आहेत. त्यामुळे हा बाजार पटाच्या मैदानावर हटविण्यात यावे, यासाठी प्रयत्न सुरु होते. गतवर्षी मार्च महिन्यात नगरपरिषदेतर्फे सदर आठवडी बाजार पटाच्या मैदानावर भरविण्यात आला.

ठळक मुद्देसाकोली नगरपरिषदेतर्फे तयारीला सुरुवात, भाजीविक्रेत्यांसाठी सर्व सोयी उपलब्ध होणार

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : कित्येक वर्षापासून साकोली आठवडी बाजाराचा विषय प्रलंबित आहे. महामार्गावर भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे वाहतुकीला अडचणी तर निर्माण होतच होत्या. शिवाय अपघाताचे प्रमाणही वाढत होते. मात्र आता लॉकडाऊन संपताच हा आठवडी बाजार साकोली येथील पटाच्या मैदानावर भरविण्यात येणार आहे. यासाठी नगरपरिषदेतर्फे तयारी सुरु करण्यात आली आहे.अनेक वर्षापासून साकोलीचा आठवडी बाजार महामार्गाच्या दोन्ही बाजूला व एकोडी रोडच्या दोन्ही बाजूला भरत आहे. बाजाराच्या दिवशी येथील वाहतूक अडचणीची होत होती. तर बरेच अपघातही घडले आहेत. त्यामुळे हा बाजार पटाच्या मैदानावर हटविण्यात यावे, यासाठी प्रयत्न सुरु होते. गतवर्षी मार्च महिन्यात नगरपरिषदेतर्फे सदर आठवडी बाजार पटाच्या मैदानावर भरविण्यात आला. जवळपास मार्च, एप्रिल व मे महिन्यापर्यंत आठवडी बाजार तेथे भरलाही. मात्र पहिल्याच पावसात त्या मैदानावर चिखल झाले. त्यामुळे भाजी विक्रेत्यांनी पुन्हा आपआपली दुकाने पूर्ववत महामार्गाच्या दोन्ही बाजूला लावले व तेव्हापासून हा बाजार जुन्याच जागी भरत आहे. मागील वर्षी पटाच्या मैदानावर बाजार भरविण्यासाठी मैदान साफसफाई करण्यासाठी नगरपरिषदेतर्फे लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. मात्र मटन चिकन व मासेंची दुकाने जुन्याच ठिकाणी होती. त्यामुळे बाजारासाठी दोन ठिकाणी जावे लागत होते.मुख्याधिकाऱ्यांनी केले लक्ष केंद्रीतसाकोली नगरपरिषदेत नुकत्याच रुजू झालेल्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी आल्याआल्या सर्वप्रथम साकोलीच्या आठवडी बाजार, मटन मार्केटवर लक्ष केंद्रीत करून बाजार सुव्यवस्थीत केला. तर सेंदूरवाफा व साकोली येथील मटन मार्केट एकाच ठिकाणी पटाच्या मैदानावर आणला. आता इतरत्र तीन ठिकाणी भरणारा भाजीपाल्याचा बाजार हा पटाच्या मैदानावर भरविण्यासाठी सर्वसोयी करण्यास प्रारंभ केला आहे. सदर काम पूर्ण होताच लवकरच साकोलीचा आठवडी बाजार हा पटाच्या मैदानावर भरणार आहे.सहकार्याची अपेक्षासाकोलीचा आठवडी बाजार महामार्गाच्याकडेला भरत असल्याने नेहमीच अपघात घडत असतात. त्यामुळे येथील आठवडी बाजार शहरातीलच पटाच्या दाणीवर भरविण्यात यावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र याला योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने समस्या मार्गी लागली नाही. पटाच्या दाणीवर बाजार भरविण्यासाठी आता सहकार्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार