शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या’ रेतीचा लिलाव

By admin | Updated: September 1, 2014 23:20 IST

तालुक्यातील पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून साठा करून ठेवल्या जात असल्याची माहिती मिळताच तहसीलदार हंसा मोहने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व महसूल विभाग यांच्या

प्रकरण अवैध रेती साठ्याचे : साकोली तालुक्यातील पहिले प्रकरणसाकोली : तालुक्यातील पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून साठा करून ठेवल्या जात असल्याची माहिती मिळताच तहसीलदार हंसा मोहने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडउमरी येथे कार्यवाही करण्यात आली. यात २२७ ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला. अशाप्रकारची ही कारवाई पहिल्यांदाच तहसीलदार मोहने यांच्या कार्यकाळात करण्यात आली.जुलै महिन्यात साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गोंडउमरी येथे रेतीचा अवैध साठा करून ठेवण्यात आली आहे, अशी गोपनीय माहिती मिळाली होती. ही माहिती पोलीस ठाण्यामार्फत साकोलीचे तहसीलदार यांना देण्यात आली. तहसीलदार हंसा मोहने यांनी यात पुढाकार घेऊन समिती गठित केली. नायब तहसीलदार दिनकर खोत, मंडळ अधिकारी कारेमोरे, पोलीस उपनिरीक्षक बंसोड यांनी गोंडउमरी येथे जाऊन पवन झगडे यांचे घराजवळ ८० ब्रास, माटे यांच्या घराजवळ ४५ ब्रास व परसराम चांदेवार यांचे घराजवळ ५२ ब्रास व अरसोडे यांचे घराजवळ ५० ब्रास असे एकूण २२७ ब्रास रेती साठा उपलब्ध होता. महसूल व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर या रेतीची मोजणी लाखांदूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून करण्यात आली. सदर रेतीची किंमत एक लाखापेक्षा जास्त असून या रेतीचा लिलाव येत्या १६ सप्टेबरला साकोली तहसील कार्यालयात करण्यात येणार आहे.साकोली तहसील कार्यालयातर्फे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैधरित्या रेतीसाठा करणाऱ्या रेतीमाफीयावर चांगलाच वचक बसला आहे. साकोली तालुक्यात कोणत्याही ठिकाणी असा रेतीसाठा असल्यास त्याची माहिती पोलीस किंवा तहसील कार्यालयात देण्याचे आवाहनही तहसीलदार मोहने यांनी नागरिकांना केले आहे. (तालुका प्रतिनिधी)