शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
4
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
5
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
6
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
7
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
9
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
10
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
11
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
12
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
13
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
14
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
15
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
16
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
17
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
18
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
19
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
20
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!

अखेर धो-धो बरसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:24 IST

बऱ्याच प्रतीक्षेनंतर वरुणराजाची कृपा जिल्ह्यावर झाली. मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला मंगळवारी रात्रीच्या पावसाने सुखावले आहे.

करडी येथे दोन घरे जमीनदोस्त : गोसेखुर्द धरणाचे १७ दरवाजे उघडलेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बऱ्याच प्रतीक्षेनंतर वरुणराजाची कृपा जिल्ह्यावर झाली. मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला मंगळवारी रात्रीच्या पावसाने सुखावले आहे. रात्री १० वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील सातही तालुक्यात धो धो पाऊस बरसला. काही ठिकाणी घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यावर्षीच्या हंगामात सर्वाधिक पाऊस काल रात्री बरसला. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून आजपासून रोवणीला वेग आला आहे.भंडारा शहरात रात्री १० वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाने सुरुवात झाली. जवळपास ४५ मिनिटांपर्यंत विजांच्या कडकडाटांसह धो धो पाऊस बरसला. दिवसभर उन तापल्यामुळे आधीच उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. या वर्षातील तद्वतच मान्सून सत्रातील हा पहिला पाऊस सर्वांच्या आठवणीत राहणारा ठरला. नवेगावात मुसळधार करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी जवळील नवेगाव (बुज) येथे काल रात्री मुसळधार पाऊस व चक्रीवादळाने तांडव केले. विजेच्या प्रचंड कडकडाटासह आलेल्या चक्रीवादळाने गावातील १५ ते १६ घरांचे नुकसान झाले. दोन घरे जमिनदोस्त झाली. घरगुती साहित्य, अन्नधान्य व गरजेच्या वस्तूंचे मोठे नुकसान झाले. घरांचे पूर्णत: नुकसान झालेल्या कुटुंबियांनी ग्रामपंचायत व शाळेच्या वर्ग खोलीत आश्रय घेतला असताना प्रशासनाची मुदत दुपारपर्यंत नवेगावात पोहचली नव्हती. स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी पोहचून विदारक परिस्थितीची माहिती तालुका प्रशासन व लोकप्रतिनिधींना देताच मदतीचे आश्वासन दिले.घरात पाणी शिरल्याने घरात उभे राहण्यासही जागा शिल्लक नव्हती, अशी आपबिती नागरिकांनी सांगितली. संपूर्ण गाव निसर्गाच्या रौद्र रुपाने रात्रभर भयभीत होता. सर्वांनी रात्र जागून काढली. परिसरात अनेक गावात व शेतशिवारात झाडे उन्मळून पडली. पांजरा - बोरी राज्यमार्गावरील झाडे कोसळल्याने रस्ता बंद पडला होता. नागरिकांच्या मदतीने रस्ता मोकळा करण्यात आला. रात्रभर विद्युत पुरवठा खंडीत होता. अनेक ठिकाणी विद्युत पोल व तारा कोसळण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून आल्या. सकाळी घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांचा लोंढा नवेगावच्या दिशेने जाताना दिसत होता. जि.प. सदस्य निलीमा इलमे, भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत इलमे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वासुदेव बांते, माजी जि.प. सदस्य महेंद्र शेंडे, नवेगावचे सरपंच चकोले, उपसरपंच विजय बांते, मोहगावचे उपसरपंच अशोक शेंडे, करडीचे ठाणेदार तुकाराम कोयंडे व पोलीस विभागाची चमू व अन्य लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेवून आ.चरण वाघमारे व प्रशासनाला माहिती दिली. तलाठी व ग्रामसेवकांच्या माध्यमातून नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरु करण्यात आले. घरे जमीनदोस्त झालेले चंदन संपत तिबुडे व अनवर टिकाराम सपाटे यांनी अनुक्रमे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीत आश्रय देण्यात आला. भाऊराव श्रीराम पुडके यांचे दुकान पूर्णत: पडले. देवदास सदाशिव चामलाटे यांच्या घराचे सिमेंट पत्रे उडाले. सीता अरुण शेंडे यांच्या घराची भिंत व गाईचा गोठा कोसळला. जायत्रा एकनाथ शेंडे यांचा गुराचा गोठा पुर्णत: कोसळला. संग्राम जयदेव चामलाटे यांचा गोठा पडला. दसाराम हरिराम शेंडे यांचा गोठा व घराचे छत कोसळले. मनोहर टिकाराम सपाटे यांच्या गुरांचा गोठा कोसळला. ताराचंद शेंडे यांच्या घराचे छत कोसळले. अनंतराम हरिराम शेंडे यांच्या घराचे छत उडाले. भगवान ईश्वरदास चामलाटे यांच्या घराच्या भिंतीला जबर हादरे बसल्याने भिंतीला भेग पडली. मनोहर बिसन चामलाटे यांचे घराला मोठ्या भेगा पडल्या. राजहंस जयदेव चामलाटे यांच्या गुरांचा गोठा पूर्णत: कोसळला. अशोक बिसन टेकाम व धनराज पांडूरंग पुराम यांच्या घरावरील छत उडाले. यात लाखोंचे नुकसान झाले. सुदैवाने जीवहानी झाली नाही.नुकसानीची पाहणी तलाठी के.आर. अमृते यांनी करून पंचनामा मोहाडी तहसील कार्यालयात सादर केला आहे. करडी पोलिसांनी पंचनामा केला. दोन्ही घरे जमीनदोस्त झालेल्या परिवारांना ग्रामपंचायतच्या ठिकाणी राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपादग्रस्त कुटुंबांना तात्काळ अन्नधान्य व गरजेच्या वस्तू पुरविल्या जातील, असे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. ज्या लाभार्थ्यांची नावे घरकुलांच्या ब यादीत आहेत, अशांना प्राधान्याने यादीत समाविष्ट करून प्रथम प्राधान्य दिले जाईल, असे जिल्हा परिषद सदस्य निलीमा इलमे यांनी सांगितले. आपादग्रस्तांना लाभ मिळण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने सतत पाठपुरावा केला जाईल. जे खरोखरच गरजू लाभार्थी आहेत, त्यांना प्रथम घरकुल मंजूरीसाठी प्रशासनाला कळविण्यात येणार असल्याची माहिती नवेगावचे उपसरपंच विजय बांते यांनी दिली. पवनी व लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टीभंडारा जिल्ह्यात मागील २४ तासात सातही तालुक्यात एकुण ४५० मि.मी. पाऊस बरसला असून त्याची सरासरी ६४.३ मि.मी. इतकी आहे. यात भंडारा तालुक्यात ५९ मि.मी., मोहाडी ६०.२, तुमसर ३५.१, पवनी १३०.५, साकोली ३४.२, लाखांदूर ९१.५ तर लाखनी तालुक्यात ३९.६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. यात पवनी व लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टी झाली.