शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कोका अभरण्यातील झाडे खिळेमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 22:25 IST

कोका अभयारण्यातील रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या झाडांना खिळे ठोकून सुमारे ४०० सूचना फलक लावण्यात आले होते. वन्यजीवांच्या भ्रमंती मार्गावर व चराई क्षेत्रात पर्यटकांना खिळे पडलेले आढळून आल्याने वन्यप्राण्यांच्या जिवीतास धोका संभवत असल्याचे वृत्त प्रकाशित होताच एकच खळबळ उडाली. अखेर कोका अभयारण्यातील सर्व झाडांवरील खिळे ठोकलेले सूचना फलक काढण्यात आले व दुसऱ्याच दिवशी दोरीने बांधण्यात आले.

ठळक मुद्देदोऱ्यांनी बांधले फलक : कोका वनाधिकाऱ्यांनी घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : कोका अभयारण्यातील रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या झाडांना खिळे ठोकून सुमारे ४०० सूचना फलक लावण्यात आले होते. वन्यजीवांच्या भ्रमंती मार्गावर व चराई क्षेत्रात पर्यटकांना खिळे पडलेले आढळून आल्याने वन्यप्राण्यांच्या जिवीतास धोका संभवत असल्याचे वृत्त प्रकाशित होताच एकच खळबळ उडाली. अखेर कोका अभयारण्यातील सर्व झाडांवरील खिळे ठोकलेले सूचना फलक काढण्यात आले व दुसºयाच दिवशी दोरीने बांधण्यात आले.कोका अभयारण्यात महाशिवरात्रीच्या पूर्वी अभयारण्यातून जाणाऱ्या टेकेपार ते कोका, दुधारा ते सालेहेटी व ढिवरवाडा ते किटाळी मार्गावरील रस्त्याच्या कडेला विविध माहिती देणारे सूचना फलक झाडांना खिळ्यांनी ठोकण्यात आल्याचे दिसून आले. एका माहितीद्वारे स्थानिक वनाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली. ज्यांना विविध प्रकारचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले. त्यांच्याकडून हा गैरप्रकार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.मर्यादा व प्रवेशास बंदी आदींची माहिती देणारे हे सूचना फलक असले तरी ते झाडांवर खिळ्याने ठोकणे योग्य आहे का, खिळे ठोकताना काही खिळे वन्यप्राण्यांच्या भ्रमंतीच्या व चराईच्या क्षेत्रातही पडलेले पर्यटकांना दिसून आले. झाडे हे सजीव आहेत. त्यांनाही यातना होतील, याची थोडी कल्पना वनाधिकारी यांना नाही काय, असे अनेक प्रश्न निसर्ग प्रेमींकडून विचारण्यात आले.अखेर कोका अभयारण्याचे वनपरिक्षेत्राधिकारी सचिन जाधव यांच्या आदेशान्वये कार्यवाही करीत खिळे काढण्यात आले. झाडे खिळेमुक्त झाल्याने पर्यावरण प्रेमींकडून वनाधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. त्यामुळे या घटनेने जिल्ह्यातील निसर्गपे्रेमीतून आनंद व्यक्त होत आहे.