शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

अपघातानंतर दोन्ही ट्रक पेटले, चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 21:40 IST

भरधाव ट्रक एकमेकांवर आदळल्यानंतर लागलेल्या आगीत चालक होरपळून ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील सिंगोरी येथे सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात दोन्ही ट्रकची राखरांगोळी झाली असून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती.

ठळक मुद्देशिंगोरी येथील घटना : डिझेल टँक फुटल्याने घडला अनर्थ, अग्नीशमनच्या दोन बंबांनी विझविली आग

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भरधाव ट्रक एकमेकांवर आदळल्यानंतर लागलेल्या आगीत चालक होरपळून ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील सिंगोरी येथे सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात दोन्ही ट्रकची राखरांगोळी झाली असून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती.घनश्याम सदाशिव वाडीवा (३२) रा.मुरमाडी (लाखनी) असे मृताचे नाव आहे. तर अजय योगराज सोनवने (२०) रा.कन्हान जि. नागपूर असे जखमीचे नाव आहे. या आगीत घनश्यामचा जळून कोळसा झाला होता. सोमवारी सायंकाळी खरबीवरून धान रिकामे करून ट्रक क्रमांक सीजी ०४ जेसी ३२३५ लाखनीकडे जात होता. तर साकोलीकडून ट्रक क्रमांक एमएच ४० बीजे ७००१ हा नागपुरकडे जात होता. राष्ट्रीय महामार्गावरील सिंगोरी गावाजवळ या दोन ट्रकची टक्कर झाली. टक्कर एवढी भीषण होती की, घर्षणानंतर दोन्ही ट्रकने पेट घेतला. त्यातच डिझेलची टाकी फुटल्याने मोठा अनर्थ घडला. अपघात घडताच ट्रकमधील चालक - वाहकांनी उड्या टाकल्या. मात्र घनश्याम वाडीवा हा आगीच्या ज्वाळात सापडला. अवघ्या काही वेळातच त्याचा जळून कोळसा झाला.या घटनेची माहिती कारधा पोलिसांना देण्यात आली. तसेच अग्नीशमन दलालाही पाचारण करण्यात आले. कारधाचे ठाणेदार गजानन कंकाळे, पोलीस उपनिरीक्षक रुपाली फटींग यांच्यासह व जिल्हा वाहतूक शाखेचे बाळकृष्ण गाडे घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाच्या दोन वाहनांनी या आगीवर काही वेळानंतर नियंत्रण मिळविले. प्रत्यक्षदर्शीनुसार हा अपघात अतीवेगाने झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी प्रमोद शेंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघात घडला तेव्हा तेथे वाहनधारकांची मोठी गर्दी झाली होती. आग विझविणे अशक्य दिसत होते. तसेच डिझेलच्या टँकच्या स्फोटाचीही भीती असल्याने कुणी जवळ जाण्याची हिंमत करीत नव्हता.महामार्गावर तीन तास वाहतूक ठप्पअतीशय व्यस्त राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रक पेटत असल्याने या मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती. वाहनांच्या दोन्ही बाजूला लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कारखान्यातील रात्रपाळी आटोपून घरी परतणारे कर्मचारीही यात अडकले होते. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.