लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : सध्याच्या धकाधकीच्या काळात पाच दशकानंतर आयुष्याची घरघर सुरु होते. परंतु, रामपूर येथील तुळशीबाई राजीराम मालाधरी या आजीबाईने तब्बल १२३ वर्ष निरामय आयुष्य जगून गुरूवारला अखेरचा श्वास सोडला.रामपूर येथील तुळशीबाई मालाधरी यांनी १२३ वर्ष प्रकृती जपली. चालताबोलता अवस्थेत त्यांचा दिनक्रम सुरू होता. अलिकडेच तुमसर येथे एका कार्यक्रमात आमदार चरण वाघमारे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, मोहाडी पं.स.चे सभापती हरिश्चंद्र बंधाटे यांच्या उपस्थितीत तुळशीबाई यांचा सत्कार करण्यात आला. मोहाडी तालुक्यात १२३ वर्ष गाठणाºया त्या एकमेव वृद्धा होत्या. त्यांनी आपल्या आयुष्यात मुलाच्या मुली, सुना व परिवारातील १०० च्यावर नातवंड बघितले होते. त्यांना चार मुले होती. त्यातील तीन मुलांचा मृत्यू झाला. दोन मुलीपैकी एका मुलींचा मृत्यू झाला. त्यांनी आयुष्यात आजार बघितला नाही.बुधवारला रात्री जेवण केल्यानंतर रात्री ८.३० वाजता त्यांचे निधन झाले. मोहाडीचे सभापती हरिश्चंद्र बंधाटे यांच्या आईची आजी आहे. तुळशीबाई यांच्या पार्थिवावर गुरूवारला सूर नदी काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
१२३ वर्षानंतर तिने घेतला अखेरचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:36 IST
सध्याच्या धकाधकीच्या काळात पाच दशकानंतर आयुष्याची घरघर सुरु होते. परंतु, रामपूर येथील तुळशीबाई राजीराम मालाधरी या आजीबाईने
१२३ वर्षानंतर तिने घेतला अखेरचा निरोप
ठळक मुद्देतुळशीबाई राजीराम मालाधरी या आजीबाईने तब्बल १२३ वर्ष निरामय आयुष्य जगून गुरूवारला अखेरचा श्वास सोडला.