शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘ए माय, मीबी एतो पेंड्या फेकाले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:25 IST

अड्याळ : ‘शाळा कधी सुरू होयल, का माहीत. म्या, माया लहान भाऊ रिकाम असल्यान मायसंग वावरात जातो. पण माय ...

अड्याळ : ‘शाळा कधी सुरू होयल, का माहीत. म्या, माया लहान भाऊ रिकाम असल्यान मायसंग वावरात जातो. पण माय काई येवू देत नाही. माय वावराकडे गेली की आम्ही बी तिच्या माग माग जायले लागलं की तिले ‘ए माय, मीबी एतो पेंड्या फेकाले’ असा रटाव लागते. कवा जाऊन माय वावरात येवू देते....’ ग्रामीण भागात आजही शेतीवरच प्रपंच चालतो. हाताला काम नाही. शाळा तर सुरू होईलच; पण तोपावेतो घरात बसण्यापेक्षा आपल्याच शेतात दोन कामे केली तर त्याचा फायदाच होईल, अशी कल्पना कदाचित या चिमुकल्यांना असावी. कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाऊन सर्वांनीच अनुभवले. यातून शेतीला मुभा असल्याने विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी आपले पिढ्यान‌्पिढ्यांचे उपजीविकेचे साधन असलेल्या शेतीच्या कामात दंग आहेत. अडयाळ येथील शेतातील चिखलात मोठी कसरत करीत भातपिकाच्या पेंढ्या नेणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर कुठेही थकवा जाणवत नाही वा कंटाळाही जाणवत नाही.

बॉक्स

कोरोनाकाळात स्थिती बिकट

दीड वर्षात सतत कोरोनाचा मार सहन करता-करता विशेषतः ग्रामीण भागातील आर्थिक तथा शैक्षणिक परिस्थिती बिकट झाली. ही परिस्थिती पुन्हा भरून काढण्यासाठी तारेवरची कसरत केल्याशिवाय ग्रामस्थांजवळ दुसरा पर्याय उरला नाही. ग्रामीण भागातील लहान मुले घरच्या शेतावर जमेल ते काम करताना दिसतात. अडयाळ किटाळी मार्गावर असणाऱ्या शेतात बालके कुटुंबीयांसोबत काम करताना दिसतात. घरची आर्थिक वा मानसिक स्थितीसुद्धा बिकटच होत चालली आहे. त्यामुळे प्रत्येक कामात ही मुले मदत करताना दिसत आहेत.