शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

अड्याळ ग्रामस्थांचा खासदारांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 21:46 IST

अड्याळ तालुक्याच्या मागणीसाठी संतप्त असलेल्या परिसरातील नागरिकांनी खासदार मधुकर कुकडे यांना घेराव घालून संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देतालुका निर्मितीची मागणी : अड्याळ तालुका हमखास करण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळ तालुक्याच्या मागणीसाठी संतप्त असलेल्या परिसरातील नागरिकांनी खासदार मधुकर कुकडे यांना घेराव घालून संताप व्यक्त केला.पंचायत समिती पवनी जिल्हा परिषद भंडारा तर्फे गुरुवारला अड्याळ येथील बाजार ग्राऊंड येथे तालुकास्तरीय कृषी प्रदर्शनी तथा शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा विरोध नसला तरी या कार्यक्रमात येणारे जिल्ह्याचे आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींचा तथा नेते मंडळींना गावबंदी असल्याची बातमी एक दिवसा आधीच प्र्रकाशित झाल्याने नेते मंडळींना ही बातमी विचार करण्यासारखेच होते. तालुकास्तरीय कृषी प्रदर्शनी तथा शेतकरी मेळाव्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सहउद्घाटक आलेच नाही. पंरतु कार्यक्रमाचे उद्घाटक मधुकर कुकडे खासदार भंडारा, गोंदिया हे मात्र उशिरा का होईना ते कार्यक्रमाला आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला अड्याळ ग्रामस्थांनी कुठलाही विरोध दर्शवला नव्हता. कारण मंचकावर त्यावेळी मधुकर कुकडे, डॉ. परिणय फुके, अ‍ॅड. रामचंद्र अवसरे हे जिल्ह्याचे नेतृत्व करणारी मोठी नेते मंडळी नव्हती. कार्यक्रमाच्या शेवटी मधुकर कुकडे आल्याची जशी माहिती ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांनी पशुवैद्यकिय दवाखाना येथे खासदार मधुकर कुकडे यांना घेराव घातला व निवेदन दिले. निवेदन दिल्यानंतर अड्याळ पोलीस ठाणे येथे चर्चा बैठक मधुकर कुकडे यांनी घेतली. त्यात शंभर टक्के अड्याळला तालुका करणार म्हणून तोंडी आश्वासन दिले. यावेळी शेकडो अड्याळ ग्रामवासी निवेदन देतांना व चर्चा बैठकीत उपस्थित होते.