शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अड्याळ गाव तसे चांगले, पण समस्यांनी वेढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:42 IST

अड्‌याळ : गावातील समस्या काही नवीन नाहीत. अनेक वर्षे झाली, अनेक ग्रामपंचायत प्रशासन आले आणि गेलेत, परंतु गावातील ज्या ...

अड्‌याळ : गावातील समस्या काही नवीन नाहीत. अनेक वर्षे झाली, अनेक ग्रामपंचायत प्रशासन आले आणि गेलेत, परंतु गावातील ज्या अति महत्त्वाच्या समस्या आहेत, त्या आजही सुटलेल्या तर नाहीतच, पण उलट गावातील विविध समस्यांत वाढही झाली आहे.

अड्‌याळ ग्रामवासीयांनी १३ ऑगस्ट रोजी गुजरी चौकातील मुन्ना हॉल येथे बैठक घेतली. त्यात १८ ऑगस्टला जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्याचे ठरले आहे. त्यात माजी शिक्षण राज्यमंत्री यांच्यासोबत एक शिष्टमंडळ जाणार आहे. या बैठकीत माजी शिक्षण राज्यमंत्री विलास शृंगारपवार, डॉ. उल्हास हरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य, राजेंद्र ब्राम्हाणकर, नंदलाल मेश्राम, मुनिश्वर बोदलकर तंटामुक्त समिती अध्यक्ष, नितीन वर्गांटीवर, अमोल उराडे, आशिक नैतामे, कमलेश जाधव, शुभांगी पवार, ताराबाई कुंभलकर आदी महिला, पुरुष वर्ग तथा युवक मंडळी गावसमस्या चर्चेत उपस्थित होती.

गावातील पथदिवे गेल्या दीड महिन्यापासून बंद, गावात अशुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, गावातील तथा गावाबाहेर स्मशानभूमीत जाणाऱ्या रस्त्यावर वाढलेले अतिक्रमण, नायब तहसील कार्यालय आहे, तसेच ग्रामविकास अधिकारी ठरलेल्या दिवसात सुद्धा वेळेवर येत नाही, पण पूर्णवेळही ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारी लाभला नाही. गावात पाणीपुरवठा होणाऱ्या पंप हाऊसमध्ये कर्मचाऱ्यांना अद्याप क्वार्टर बांधून मिळाले नाहीत वा जमीनही मिळाली नाही. तसेच गावातील ले आऊटमधील ग्रामपंचायतीला मिळालेले प्लॉट सुद्धा ग्रामपंचायतीच्या नावावर तर झाले नाहीतच, पण लाखोंची नळ योजना, तिलाही ग्रहण लागले आहे. तसेच आजपर्यंत येथील बसस्थानकाचा प्रश्न... अशा विविध समस्यांनी येथील ग्रामस्थ त्रस्त आहेत. यासाठी माजी शिक्षण राज्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली अड्‌याळ येथील एक पाचसदस्यीय शिष्टमंडळ जाणार असल्याची माहिती आहे.