शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

हुंडा प्रतिबंधासाठी आता सल्लागार मंडळ

By admin | Updated: July 26, 2016 00:44 IST

केंद्र शासनाच्या हुंडा प्रतिबंधक अधिनियमातील तरतुदीनुसार आता जिल्हास्तरावर हुंडा प्रतिबंधक सल्लागार मंडळ गठीत होणार आहे.

अर्ज मागविले : ३० पर्यत शेवटची तारीखभंडारा : केंद्र शासनाच्या हुंडा प्रतिबंधक अधिनियमातील तरतुदीनुसार आता जिल्हास्तरावर हुंडा प्रतिबंधक सल्लागार मंडळ गठीत होणार आहे. महिला व बालविकास विभागाने याबाबत जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. या सल्लागार मंडळात सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश राहील.केंद्र शासनाच्या हुंडा प्रतिबंधक अधिनियम १९६१ च्या कलम ८ ब त्याच्या तरतुदीनुसार हुंडा प्रतिबंधक अधिकऱ्यांना मार्गदर्शक करण्यासाठी सल्लागार मंडळ नेमण्याचे राज्य शासनाचे आदेश आहेत. एका महिन्याच आत जिल्हास्तरावर हे पाच सदस्यीय सल्लागार मंडळ अस्तित्वात येईल. त्या-त्या जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कमाल पाच व्यक्तिंचा या समितीत समावेश राहील. यात दोन सदस्य महिला असणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे जिल्हास्तरावर सल्लागार मंडळ गठित करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. या सल्लागार मंडळाचा पदावधी तीन वर्षे इतका असेल व त्यांचे सदस्य पुनर्नियुक्तीसाठी पात्र असणार आहेत. हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्यांना सल्ला देणे व त्यांना मदत करणे, अशा या मंडळाची कार्यकक्षा राहील. ज्यांच्या ठायी क्षमता, सचोटी आणि प्रतिष्ठा असेल आणि ज्यांना महिलांच्या शोषणा संबधीच्या समस्या सोडविण्याबाबतचे पुरेसे ज्ञान व अनुभव असेल असा व्यक्ती या सल्लागार मंडळात सदस्य म्हणून निवडण्यास पात्र ठरेल. हुंडा प्रतिबंध अधिनियम, महिलांच्या शोषणासंबंधी समस्या सोडविणे, महिलांच्या संबंधातील कायदे, त्यांचा विकास व पुनर्वसन याबाबतचे ज्ञान व त्यासंबधातील कायार्चा अनुभव असणाऱ्या व्यक्तींना पसंती देण्यात येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)