शहरं
Join us  
Trending Stories
1
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
2
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
3
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
4
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?
6
प्रशांत किशोरांचा निर्णय झाला! ब्राह्मणबहुल मतदारसंघातून उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात
7
SIP नं बनाल कोट्यधीश की PPF नं; ₹९५,००० वार्षिक गुंतवणूकीवर कोण बनवेल करोडपती, खरा चॅम्पिअन कोण?
8
AI मुळे नोकऱ्या धोक्यात? 'या' टेक कंपनीने एका झटक्यात ४,००० कर्मचाऱ्यांना काढले बाहेर!
9
आयफोन १७ ची किंमत लीक, जरा थांबा...! किडनी विकावी लागणार की नाही, एवढी असेल...
10
शीना बोरा हत्याकांडात १३ वर्षांनी मोठा ट्विस्ट! इंद्राणी मुखर्जीची मुलगी असं काय बोलली की केसची दिशाच बदलली?
11
मारुतीची नवी व्हिक्टोरिस SUV लॉन्च, फुल टँकमध्ये 1200Km पर्यंत धावणार! 5-स्टार सेफ्टी, 10.25-इंचांचे इंफोटेनमेंट अन् बरंच काही...
12
मराठा समाजानंतर आता OBC समाजासाठी उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
13
TCS कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! कंपनीने दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांना दिलं 'वेतनवाढी'चं गिफ्ट
14
मंत्रिमंडळ १५ निर्णय; मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, लोकल ट्रेन खरेदी, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर
15
'हार्ले-डेव्हिडसन'बाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोटा; टॅरिफ नाही, या कारणासाठी भारतातून कंपनी बाहेर गेली
16
'पैसे बचाओ' पॉलिसी! ९ ते ५ दरम्यान कर्मचाऱ्यांवर 'वॉच', 'फोनाफोनी'चाही घेणार 'हिशेब'; Amazon मध्ये काय घडतंय?
17
Ola Electric च्या शेअरनं पकडला तुफान 'स्पीड'; ६ दिवसांत ४२% ची वाढ, गुंतवणूकदार मालामाल
18
"हा माझा पती... नाही तो माझा पती"; लाथाबुक्क्या हाणल्या, बाटल्या फेकून मारल्या, पोलीस स्टेशनसमोर महिलांमध्ये जुंपली! 
19
बस्तर पूरग्रस्तांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री! बचावकार्यात हलगर्जीपणा चालणार नाही; अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
20
Astro Tips: लग्नाची सप्तपदी आयुष्यभराची तप्तपदी होऊ नये म्हणून लग्नापूर्वी घ्या 'ही' काळजी!

रोहिणी नक्षत्राच्या पर्वावर उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहीम

By admin | Updated: May 23, 2017 00:22 IST

सुरु होणाऱ्या हंगामात पिकांच्या उत्पादन खर्चापेक्षा अधिक तसेच पिकांसाठी घेतलेल्या पीक कर्जापेक्षा ....

१०८ गावात जागृती : कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार होणारलोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : सुरु होणाऱ्या हंगामात पिकांच्या उत्पादन खर्चापेक्षा अधिक तसेच पिकांसाठी घेतलेल्या पीक कर्जापेक्षा अधिक उत्पन्न शेतकऱ्यांना खात्रीशिर मिळावे यासाठी रोहिणी नक्षत्राच्या दिवशीपासून उन्नत शेती - समृद्ध मोहिम राबविली जाणार आहे. शेतकऱ्यांमध्ये कृषी तंत्रज्ञानाचा व योजनांची जनजागृती या मोहिमेअंतर्गत केली जाईल यासाठी तालुका कृषी अधिकारी मोहाडी कार्यालयाने तालुक्यातील १०८ गावासाठी सभेचे नियोजन केले आहे.शेतकरी खरीप हंगामाची सुरुवात रोहिणी नक्षत्रापासून करीत असतो. खरीप हंगामामध्ये लागणारी बियाणे, खते, कीटकनाशके, सिंचन, कृषी तंत्रज्ञान आदींची माहिती शेतकऱ्यांना आधीच मिळाली पाहिजे. याची पूर्वतयारी करण्याच्या हेतुने तसेच शासनाच्या कृषी विषयक योजनांची माहिती प्रत्यक्षपणे गावातच दिली जाण्यासाठी उन्नत शेती समृद्ध शेतकरी पंधरवाडा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मोहाडी तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी १०८ गावासाठीचे नियोजन तयार केले आहे. २५ मे ते ८ मे पर्यंत गावात सकाळी ८ ते ११ या वेळेत सभेचे आयोजन करण्यात आले. २५ मे रोजी दहेगाव, वरठी, नेरी, मुंढरी बु., खडकी, जांभोरा, हरदोली झं., कांद्री, धोप, आंधळगाव या गावातून मोहिमेची सुरुवात केली जाणार आहे. मोहिमेसाठी समन्वय अधिकारी म्हणून कृषी पर्यवेक्षक व्ही.डी. झलके, एन.के. चांदेवार, ओ.पी. भट, ए.एस. सार्वे यांची नियुक्ती करण्यात आली. तर संपर्क अधिकारी म्हणून जे.ए. आकरे, बी.एन. तिजारे, एन.डी. भोंगाडे, वाय.के. नागपुरे, डी.एम. वाडीभस्मे, वाय.जी. बारापात्रे, यु.एस. निखारे, एस.एस. वाळके, पी.ए. धापटे, पी.बी. गुंडे, एस.पी. गेडाम, पी.आर. भोयर, एस.पी. आंभोरे, डी.एन. चकोले, जी.एल. समरीत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळ कृषी अधिकारी आर.जी. गायकवाड, व्ही.डी. झलके आदींची मार्गदर्शक म्हणून गावनिहाय टीम तयार करण्यातआली आहे. ८ जून रोजी केसलवाडा, मोरगाव, वडेगाव व चिचखेडा येथे मोहिमेचा समारोप करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत या वर्षापासून तालुका हा कृषी विकास व उत्पादन वाढीसाठी नियोजनाचा घटक म्हणून निश्चित करण्यात आला आहे. प्रमुख पिकांची सध्याची उत्पादकता, अनुवंशिक उत्पादन क्षमता व साध्य करावयाच्या उत्पादन वाढीचा लक्षांक याबाबत प्रत्येक गावात शेतकऱ्यांच्या सभेत माहिती दिली जाईल. लक्षांक साध्य करण्याकरिता कृषी तंत्रनाची माहिती दिली जाईल. गावस्तरावरील प्रगतशील शेतकरी, पिकस्पर्धा विजेते, शेतकरी यांचे अनुभव कथनही होईल. गावातील सरपंच, ग्रा.पं. सदस्य, कृषी विज्ञान मंडळ, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, बँक, आत्मा, संबंधित समित्या, कृषी संलग्नीत, ग्रामस्तरीय कर्मचारी यांचाही या मोहिमेत सहभाग केला जाणार आहे.