लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : गत २० वर्षापूर्वी वाडीत टाकलेल्या वडीलांची संपत्ती आपल्याच मिळावी म्हणून दत्तक असलेल्या मुलानेच वडिलाचा अपहरण केला असल्याचा प्रकार तुमसर नजिकच्या खापा येथे घडल्याचे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उजेडात आले.महादेव गणपत पिकलमुंडे वय (८५)रा.खापा असे अपहरण झालेल्या वयोवृद्धाचे नाव आहे. नजिकच्या खापा येथे वास्तव्यास असलेल्या महादेव ला मुल बाळ नव्हते. मात्र त्यांच्याकडे संपत्ती होती. त्याची संपत्ती आपल्याच मिळावी म्हणून त्याच्या पुतण्या दिनेश बाजीराव पिकलमुंडे याने खोटे दस्ताऐवज तयार करून दत्तक पुत्र असल्याचा कांगावा केला व महादेवच्या नावाने असलेले घर आदी आपल्या नावे करून घेतले.दरम्यान आता महादेवकडे काची उरले नसल्याचे समजून २० वर्षापूर्वी त्याच्या दत्तक पुत्राने महादेवला त्याच्याच घरातून मारझोड करून हाकलून दिले. त्यावेळी महादेव हे खापा येथे भिक्षा मागून जिवन जगत होते. कोणत्याही नातेवाईकांनी मदत केली नाही. दरम्यान महादेवच्या भावाचा मुलगा उदाराम मोडकू पिकलमुंडे याने महादेवचा मागील १२ वर्षापासून सांभाळ चांगल्या प्रकारे करीत असताना अजूनही ५ एकर शेतजमिन हि महादेवच्या नावावर असल्याचे लक्षात येताच दि.२८.९.--- ला दुपारी ३.३० च्या दरम्यान त्या दत्तक पुत्राने जवळपास १० लोकांना सोबत येवून उदाराम पिकलमुंडेचे घर व घरात अनधिकृतरित्या प्रवेश करून महादेवला फरफटत नेत चाकी गाडीत बसवून अपहरण करून घेवून गेले. त्याबाबतची तुमसर पोलिसात त्याच वेळी तक्रार करण्यात आली. मात्र अजूनपर्यंत अपहरण कर्त्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे अपहरण करून त्याचा खूप करण्यात आला असावा असा संशय पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व्यक्त करून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला आहे.हे संपत्तीचे वाद आहे. अपहरणाची तक्रार आहे. या संदर्भात दत्तक मुलगा व अपहरण कर्त्याच्या पत्नीचा बयाण नोंदविण्यात आले आहे.-मनोज सिडाम, पोलीस निरिक्षक तुमसरया प्रकरणात पोलिसांनी केवळ मुलाची व आईचा बयाण नोंदविला आहे. अजूनपर्यंत महादेवचे बयाण नोंदविण्यात आले नाही. त्यामुळे महादेव गेला कुठे? असा संशय निर्माण झाला आहे.-उदाराम पिकलमुंडे, पोषणकर्ता तक्रारदार
संपत्तीसाठी दत्तक पुत्राने केले अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 22:28 IST
गत २० वर्षापूर्वी वाडीत टाकलेल्या वडीलांची संपत्ती आपल्याच मिळावी म्हणून दत्तक असलेल्या मुलानेच वडिलाचा अपहरण केला असल्याचा प्रकार तुमसर नजिकच्या खापा येथे घडल्याचे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उजेडात आले.
संपत्तीसाठी दत्तक पुत्राने केले अपहरण
ठळक मुद्देखापा येथील प्रकार : तुमसर पोलिसात तक्रार दाखल