शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

सॅनिटायझर व ताप तपासणीनंतर दिला जातो प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:01 IST

कोरोना लॉकडाऊनचे काळात मुंढरी बु. ग्रामपंचायतीचे वतीने घनकचरा व नाल्यांची साफसफाई, चारदा गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. पुणे, मुंबई व नागपूर शहरातून गावात येणाºयांना सर्वप्रथम गावाबाहेरील शाळेत क्वारंटाईन केले जाते. सरपंच एकनाथ चौरागडे जातीने हजर क्वारंटाईन नागरिकांना कोरोना काळात घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करतात.

ठळक मुद्देसंडे अँकर । मुंढरी ग्रामपंचायतीचा उपक्रम : मास्क व फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात मोहाडी तालुक्यातील मुंढरी बु. ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांना कर्मचाऱ्यांमार्फत सॅनिटाईज व तापाची तपासणी झाल्यानंतर प्रवेश दिला जात आहे. ग्रामस्थांकडून मास्क व फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करवून बाहेरून येणाऱ्यांना गावात क्वारंटाईन केले जात आहे.कोरोना लॉकडाऊनचे काळात मुंढरी बु. ग्रामपंचायतीचे वतीने घनकचरा व नाल्यांची साफसफाई, चारदा गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. पुणे, मुंबई व नागपूर शहरातून गावात येणाºयांना सर्वप्रथम गावाबाहेरील शाळेत क्वारंटाईन केले जाते. सरपंच एकनाथ चौरागडे जातीने हजर क्वारंटाईन नागरिकांना कोरोना काळात घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करतात.याबाबत कोरोना काळात सहकारी संस्था, आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पोलीस पाटील, करडीचे ठाणेदार, तलाठी व अन्य अधिकाºयांच्या अनेकदा ग्रामपंचायतीमध्ये बैठका घेऊन त्यांचे विचार जाणून घेत गावात उपाययोना करवून घेतल्या. ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने सॅनिटायझर्स मशीन लावण्यात आली. तसेच शुद्ध पिण्याचे पाणी व ताप तपासणीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी तैनात केले. ग्रामस्थांना सॅनिटाईज व तापाची तपासणीनंतरच प्रवेश दिला जातो. प्रत्येक वॉर्डात घाण व नाल्या उपसण्याचे काम करण्यात आले. गावात नाल्यांच्या उपासाबरोबर साफसफाई करण्यात आली. चारदा गाव सॅनिटाईज करण्यात आले. बाजाराची साफसफाई करवून घेतली जाते.पदाधिकाºयांची तत्परताजिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच गावात परजिल्ह्यातून येणाºया नागरिकांकडे येथील पदाधिकाºयांची करडी नजर आहे. यासाठी गावाबाहेरील शाळेत येणाºयांची प्रथम तपासणी केली जाते. आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशावर्कर, आरोग्य सेविका यांची तत्परता दिसून येते.मुंढरी ग्रामस्थांचा पुढाकारकोरोना संकटकाळात शहरासह ग्रामीण भागात धास्ती पसरली आहे. यावर मात करण्यासाठी प्रशासन नानाविध उपाययोजना करीत आहेत. मात्र आजही अनेक नागरीक प्रशासनाला सहकार्य करीत नसल्याचे दिसून येते. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी मुंढरी वासीयांनी निर्धार केला असून त्यांच्या पुढाकारानेच येथे आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत असल्याचे दिसत आहे.मास्क व फिजीकल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन केले जाते. कोरोना काळातील या कामांमुळेच मुंढरी बु. गावाची आदर्श गावाकडे वाटचाल सुरु आहे.- एकनाथ चौरागडे, सरपंच मुंढरी बु.सरपंचांच्या सूचनेप्रमाणे गावातील अंतर्गत कामकाज सुरु आहेत. बाहेरुन येणाºयांची जातीने हजर राहून तपासणी केल्यानंतरच ग्रामपंचायतमध्ये प्रवेश दिला जातो. नागरिकांना सतर्कतेच्या वेळी सूचना व मार्गदर्शन केले जाते.- अशोक बागडे, ग्रामसेवक मुंढरी बु.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत