शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

भंडारा येथे भूमिगत गटार योजनेला प्रशासकीय मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 21:44 IST

भंडारा शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक अशा भूमिगत गटार योजनेला शासनाने काही दिवसांपूर्वी तांत्रिक मान्यता प्रदान केली होती. १६७ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करण्यात आला होता. दरम्यान, १६७ पैकी ११६ कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याला शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरासाठी अत्यंत उपयुक्त आणि शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या भूमिगत गटार योजनेच्या १६७ कोटींपैकी ११६ कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याला शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. त्यामुळे आता भूमिगत गटार योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे शहरातील पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होण्यास मदत होणार असून, सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.भंडारा शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक अशा भूमिगत गटार योजनेला शासनाने काही दिवसांपूर्वी तांत्रिक मान्यता प्रदान केली होती. १६७ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करण्यात आला होता. दरम्यान, १६७ पैकी ११६ कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याला शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. शासकीय मान्यता मिळाल्यामुळे आता निविदाप्रक्रिया होऊन प्रत्यक्ष लवकरच कामाला सुरुवात होण्याची आशा निर्माण झाली आहे.शासननिर्णयानुसार १० जुलै २०१७ च्या सर्वसाधारण सभेत या प्रकल्पासाठी भंडारा नगर परिषदेच्या १४ व्या वित्त आयोगातून १८ कोटी रकमेचा, लोकवर्गणीचा १५ टक्के सहभाग मागविण्याबाबतचा ठराव नगराध्यक्ष सुनील मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते मंजूर केला होता. या कामाला सर्व नगरसेवकांनी एकमताने मंजुरी दिली होती. त्यामुळेच ही योजना आकारास येत असल्याचे नगराध्यक्ष मेंढे यांनी सांगितले.

नगरपरिषदेची महत्त्वाकांक्षी योजना - नगराध्यक्षांची निवडणूक लढविताना भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांनी या योजनेचा  समावेश घोषणापत्रात केला होता. नगराध्यपदी विराजमान झाल्यावर त्यांनी सर्वप्रथम पाणीपुरवठा आणि भूमिगत गटार योजना मंजुरीसाठी प्रयत्न केले. मलनिस्सारण केंद्राच्या  जागेसाठी वारंवार गोसेखुर्द प्रकल्पाशी पाठपुरावा करून  दोन ठिकाणच्या जागा लीजवर मिळविण्यात नगराध्यक्षांची भूमिका महत्त्वाची होती. नवीन पाणीपुरवठा योजना आणि भूमिगत गटार योजना हे दोन्ही प्रकल्प नगराध्यक्षांचे महत्त्वाकांक्षी आहेत. त्यानुसार पाणीपुरवठा योजनेच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.  दरम्यान, भूमिगत गटार योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. जुलै महिन्यात १६७ कोटींच्या प्रकल्पाला तांत्रिक मान्यता मिळाली होती. पाणीपुरवठा योजनेचे ५० टक्के काम पूर्ण झाले असल्याने भुयारी गटार योजनेच्या पहिला टप्प्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. 

भूमिगत गटार योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली असून  माझ्यासह सहकारी नगरसेवक यांचे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. यामुळे आता लवकरच भंडारा शहरात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू झाल्याचे पहायला मिळेल. या योजनेमुळे भंडारा शहराच्या वैभवात भर पडणार आहे.-सुनील मेंढे, नगराध्यक्ष तथा खासदार