शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

एका नायब तहसिलदारांवर साकोली तालुक्याचा कारभार

By admin | Updated: July 24, 2016 00:26 IST

इंग्रजकालीन तहसिल कार्यालय म्हणून साकोली तहसील कार्यालयाची ओळख आहे.

नागरिकांची कामे खोळंबली : तहसीलदारांवर नगरपरिषदेचे अतिरिक्त कामसंजय साठवणे साकोलीइंग्रजकालीन तहसिल कार्यालय म्हणून साकोली तहसील कार्यालयाची ओळख आहे. मात्र सध्या या कार्यालयाला ग्रहण लागले असून अधिकाऱ्याअभावी नागरिकांची कामे खोळंबली आहेत. या कार्यालयासाठी नायब तहसिलदार ही चार पदे मंजुर असताना केवळ एक तहसिलदार आहे. साकोली तालुक्यात ९६ गावे आहेत. या ९ गावांचा कारभार या तहसिल कार्यालयातून चालतो. शासनाने तहसिल कार्यालयासाठी चार नायब तहसिलदारांची पदे मंजुर केली आहेत. यात निवडणुक विभाग, तपासणी पथक व दोन सामान्य विभाग अशी चार वेगवेगळी विभाग आहेत. सदर तहसिल कार्यालय हे उपविभागाला लागुन असल्यामुळे इथे कामाचा ताण आहे. मात्र शासनाने चार नायब तहसिलदारऐवजी एकच नायब तहसीलदार देऊन साकोली तालुकावासीयांवर अन्याय केला आहे. या तहसील कार्यालयात दररोज हजारो लोक विविध कामासाठी येतात. आल्यानंतर विविध दाखले, प्रमाणपत्र, सेतु करतात. मात्र कधी तहसीलदार हजर नसतात त्यामुळे सह्यासाठी नागरिकांना तासनतास प्रतिक्षा करावी लागते. तर कधी कधी अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे परत जावे लागते. एका दाखल्यासाठी नागरिकांना दोन ते तीन दिवस चकरा माराव्या लागतात. परिणामी लोकांचा पैसा व वेळही वाया जातो. याकडे अधिकारी व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष आहे. सध्यास्थितीत या कार्यालयात एकच नायब तहसिलदार कार्यरत आहे. साकोली तहसिलदाराकडे या तहसिल कार्यालयाव्यतिरिक्त साकोली नगरपरिषद प्रशासकपदाचा अतिरिक्त कारभार आहे. ही नगरपरिषद नव्याने घोषित झाल्यामुळे कामाचा ताण आहे. त्यामुळे तहसिलदारांना तहसिल कार्यालयापेक्षा अधिक वेळ नगरपरिषदेकडे द्यावा लागते. त्यामुळे ना धड तहसिलचे कामे होत ना धड नगरपरिषदेचीही कामे होतात. त्यामुळे लोकांची कामे रखडलेली आहेत.मागील महिन्यापर्यंत या कार्यालयीन दोन नायब तहसिलदार कार्यरत होते पैकी नायब तहसिलदार दिनकर खोत यांना जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे एक महिन्यासाठी पाठविण्यात आले. त्यामुळे आता या कार्यालयात एकच नायब तहसिलदार आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना या तहसिल कार्यालयाची अवस्था माहिती असुन देखील नायब तहसिलदार खोत यांना भंडारा येथे का पाठविण्यात आले. या तहसिल कार्यालयात नायब तहसिलदार या पदाबरोबरच लिपीकाचे चार ते पाच पदेही रिक्त आहेत. त्यामुळे लिपीकावर अतिरिक्त कामाचा ताण आहे. अधिकाऱ्यांनी साकोली तहसिल कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची रिक्त पदे तात्काळ भरावी अशी मागणी नागरिकांची आहे.