शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

खासगी माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे समायोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 21:33 IST

जिल्ह्यातील खासगी अनुदानीत माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषदेच्या शाळेत त्वरीत करण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या शिक्षक सेलने केली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना देण्यात आले आहे.

ठळक मुद्देभाजप शिक्षक सेलची मागणी : शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील खासगी अनुदानीत माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषदेच्या शाळेत त्वरीत करण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या शिक्षक सेलने केली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना देण्यात आले आहे.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील शिक्षकांच्या व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बऱ्याचशा मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही त्या सोडविण्यात आलेल्या नाहीत. याबाबत शिक्षकांच्या समस्या संदर्भात वरिष्ठांचे ध्यानाकर्षण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या शिक्षक सेलच्या जिल्हा शाखेमार्फत मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन न करणाऱ्या शाळांचे वेतनेत्तर व वेतन अनुदान बंद करण्यात यावे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे संच मान्यतेमधून व्यपगत करावे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना वेतन विवरण पावती देण्याचे शासन आदेशांतर्गत पालन करावे, अंशदाई निवृत्ती वेतन योजना कपातीच्या पावत्या व्याज परिगणना करून देण्यात यावी, शालेय ग्रंथालयासाठी वेतनेत्तर अनुदानातून दरवर्षी शालेय गं्रंथालयाकरिता गं्रथखरेदी न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात यावी, शिक्षण भरती पवित्र पोर्टल कार्यप्रणालीबाबत प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात यावे, शिक्षक भरती लवकर करण्यात यावी, वेतन देयकासोबत एकाच प्रकारची माहिती वारंवार मागविण्यात येऊ नये, सत्राच्या सुरुवातीलाच कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा आदी मागण्यांचा यात समावेश आहे. मागण्यांचे निवेदन देताना शिक्षक सेलचे विदर्भ प्रांत संयोजक डॉ.उल्हास फडके, संयोजक कैलाश कुरंजेकर, शशांक चोपकर, ज्ञानेश्वर बोडखे, माधव रामेकर, मंगला साटोणे, घनश्याम तरोणे, प्रसन्न नागदेवे, धनंजय पुस्तोडे, अरुण मोखारे, अरुण पारधी, शरद गिरी यासह अन्य पदाधिकाºयांचा समावेश आहे.