शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘व्हाईट इंक’च्या नशेचे मुलांमध्ये जडतेय व्यसन

By admin | Updated: April 12, 2015 01:06 IST

शहरातील गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लहान मुले व काही मुलांना खांद्यावर घेऊन भिक्षा मागणाऱ्या महिला दिसतात.

लोकमत स्टिंग आॅपरेशनतथागत मेश्राम / देवानंद नंदेश्वर वरठी / भंडारा शहरातील गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लहान मुले व काही मुलांना खांद्यावर घेऊन भिक्षा मागणाऱ्या महिला दिसतात. अनेक ठिकाणी दुकाने फिरुन भिक्षा मागतात. भिक्षा मागताना त्यांचा केविलवाणा प्रकार व दयनीय अवस्था पाहून इच्छा नसतानाही पुण्य कमविण्याचा नादात दुकानदार व प्रवाशी त्यांना पैसे देतात. कधीकधी तर ही मुले पैशासाठी लोटांगण घालुन, हातपाय पकडून पैसे मागतात. परंतु त्यांना मिळणाऱ्या दक्षिण्यातून ते ^‘नशा’ करीत असल्याचे ‘लोकमत’ च्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये आढळून आले आहे.वरठी येथील रेल्वे स्थानक, भंडारा बस स्थानक, व्यापारपेठ, हॉटेल्स, आठवडी बाजार, सार्वजनिक ठिकाण, लग्न समारंभ, उत्सव आदी ठिकाणी व दुकानांमध्ये फिरुन भिक्षा मागणाऱ्या मुलांचा सदर प्रतिनिधीने शोध घेतला. त्यामध्ये सर्वाधिक लहान मुले व मुली आढळून आले. पोटासाठी भिक्षा मागणे व मिळालेल्या पैशातून दुकानांमध्ये सहजरित्या उपलब्ध होणारे व्हाईट इंक व प्लॉस्टीकचे वस्तु चिपकविण्यासाठी उपयोगात येणारे लोशन नशेसाठी वापरत असल्याचे आढळून आले.बहुतांश मुले ही बिऱ्हाड घेऊन आलेल्या स्थलांतरीत कुटुंबातील आहेत. हे कुटुंब गावातील एखाद्या खुल्या जागेत तंबु टाकून राहत असतात. त्यांचे पालक काय करतात हे त्यांनाही ठाऊक नाहीत. परंतु ही मुले सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गावात फिरुन पैसे जमा करीत असतात. ‘नशा’ करण्याकरिता वापरण्यात येणारे व्हाईट इंक किंवा लोशन पुरते पैसे जमा झाले की ते दुकानातून खरेदी करतात. त्यानंतर कपड्यावर ओतून त्याचा गंध सुंगतात. त्यातील गंध संपला की पुन्हा पैसे गोळा करणे आणि ते लोशन विकत घेणे असा प्रकार दिवसभर सुरु राहतो.शहरातीलही काही मुलांना व्हाईट इंक व लोशनच्या नशेची सवय जडल्याची माहिती समोर आली आहे. बहुतांश पालक कार्यालयीन किंवा घरगुती कामासाठी व्हाईट इंक घरी आणून ठेवत असतात.याचा नेमका फायदा घेऊन ही लहान मुले नकळत नशा करीत आहेत. सहज म्हणून केलेला प्रयोग पुढे जाऊन त्यांची सवय होत आहे. यासाठी घरुन पैसे चोरणे, दुकानातून सामान पळविण्यासारख्या घटना घडत आहेत. पुढे जावून ही मुले बिडी, सिगारेट, तंबाखूच्या आहारी जातात. व्यसनाची सवय लागलेले अल्पवयीन मुले मद्यपान, गांजा ओढायला लागल्याचे निदर्शनास आले आहे.याकरिता पालकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. शाळेतील शिक्षक व पालकांनी नियमित मुलाचे दप्तर तपासण्याची गरज आहे. व्हाईट इंकची शिशी हुंगून नशा करतात म्हणून कपंनीने व्हाईट इंक बंद केले असले तरी बाजारात मोठ्या प्रमाणावर ते उपलब्ध आहेत.