शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

व्यसनमुक्ती जनजागृती अभियान

By admin | Updated: March 30, 2015 00:28 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार प्राप्त ब्ल्यू डायमंड संस्था व बारमाटे मेडिकल सोसायटी ..

भंडारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार प्राप्त ब्ल्यू डायमंड संस्था व बारमाटे मेडिकल सोसायटी यांच्या विद्यमाने रोहणा येथे व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. सामाजिक न्याय विभागाच्या व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमांतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या व्यसनमुक्ती एक संकल्प या पुस्तीकेचे व औषधाचे नि:शुल्क वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख राधेशाम गाढवे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी हंसराज आगासे, धनपाल गायधने, दामराज बारमाटे उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने व्यसनमुक्ती प्रचार कार्य १९९० पासून सुरु केले पंरतु पाहिजे तशी जनजागृती झालेली नाही. तेव्हा व्यसनमुक्तीबाबत प्रचार होणे ही आधुनिक काळाची गरज असल्याचे मत प्रमुख पाहुणे व दलित मित्र संस्थेचे सचिव दामराज बारमाटे यांनी व्यक्त केले.तसेच व्यसनामुळे आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामाची माहिती देण्यात आली. दारुमुळे शरीराच्या पेशी कमजोर होऊन दरवर्षी २१ वर्षाखालील ५ हजार तरुण मरण पावतात तर ७५ टक्के लोकांच्या लिव्हरची कार्यक्षमता कमी होवून त्याना काविळ आजार होतो. तर ६० टक्के नागरिकांना नैराश्य येते. तेव्हा स्वत:चे कुटूंब उद्ध्वस्त होऊ नये, तरुण पिढी व्यसनाधीन हेऊ नये व त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, म्हणून महिलांनीच स्वत:च्या घरापासून व्यसनमुती संकल्पनेची सुरवात करावी असे आवाहन डॉ. सपना पाटील यांनी केले.कार्यक्रमाला डॉ. नयना, डॉ. संतोष वाकोडे, डॉ. मुकेश काबळे, डॉ. करिश्मा, डॉ. पंकज पाटील उपस्थित होते. अधिपरिचारिका गीता बारमाटे यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या २०० महिला-पुरुष व युवकाची नोंदणी केली व नि:शुल्क औषधाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचा गावातील बहुसंख्य महिला व पुरूषांनी लाभ घेतला. कार्यक्रमाकरिता कविता सेवलेकर, ज्योती भांडारकर व मंजुषा मते यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)भाजीपाल्याचे नुकसानसानगडी : सानगडी गावात माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होत असून कवेलूच्या घरासह भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वनविभागाने त्वरीत वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.