शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

चार पोलिसांवर कारवाई

By admin | Updated: September 29, 2014 00:37 IST

बंदूक हाताळताना हलगर्जीपणा करणाऱ्या तुमसर येथील चार पोलिसांवर कारवाई करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली प्रत्येकी एक हजारांचा

प्रकरण बंदूक हयगयीने हाताळण्याचे : एक हजाराचा दंड, कारणे दाखवा नोटीसतुमसर : बंदूक हाताळताना हलगर्जीपणा करणाऱ्या तुमसर येथील चार पोलिसांवर कारवाई करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली प्रत्येकी एक हजारांचा दंडही ठोठावला आहे. या चारही पोलिसांना तडकाफडकी पोलीस मुख्यालयात रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे.तुमसर पोलीस ठाण्यातील प्रकाश बोकडे, रमेश बेदुरकर, शरद गिऱ्हेपुंजे व सुधीर कळमकर या पोलीस कर्मचाऱ्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक कैलास कणसे यांनी बंदूक हाताळताना हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून ही कारवाई केली. दि. १७ सप्टेंबर रोजी तुमसर ठाण्यातील चार पोलीस कर्मचारी भंडारा येथे सायंकाळी ६.३० वाजता तुमसरहून इव्हीएम मशीन आणण्यासाठी गेले होते. भंडाऱ्याहून मशीन घेऊन त्यांना परत यायचे होते. मशीनची तपासणी झाल्यानंतर मोजणी करण्यात आली. ही कामे होण्याकरिता रात्र उलटली. सकाळी साहित्य घेऊन तुमसर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत चारही पोलीस पोहचले. आय.टी.आय. मध्ये वेगळी गार्ड रुमची व्यवस्था नव्हती. त्यामुळे पोलिसांनी बंदुका स्वत:जवळच ठेवल्या होत्या. सकाळी ११.३० च्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक कैलास कणसे यांनी आय.टी.आय.ला भेट दिली. तेव्हा बंदुकी भिंतीला टेकून ठेवलेल्या होत्या व पोलीस तिथेच होते. पोलीस अधीक्षक कणसे यांनी बंदुकी हयगयीने हाताळणीबाबत विचारणा केली. अप्रिय घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असे विचारले. त्यामुळे पोलिसांच्या हयगयीप्रकरणी कारवाई का करण्यात येऊ नये? असे ठणकाविले. चौघांनीही आपली बाजू मांडली. कणसे यांनी त्यांना दोषी माणून एक हजारांचा दंड व कारणे दाखवा नोटीस बजावली व पोलीस मुख्यालयात रूजू होण्याचे आदेश दिले. तत्पूर्वी चौघांनीही तहसीलदार सचिन यादव यांना भ्रमणध्वनीवर बंदुकीकरिता गार्ड रुम उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. मात्र त्यांनी गार्डरुम उपलब्ध करून देण्याची जबाबदारी झटकली व स्थानिक प्राचार्यांशी संपर्क करा असे सांगितले. पोलिसांनी प्राचार्यांशी चर्चा केली तेव्हा सायंकाळी पाच पर्यंत माझे कार्यालय सुरु आहे. त्यानंतर तुम्ही या खोलीचा उपयोग करू शकता असे सांगून दुसरी गार्ड रुम उपलब्ध करून दिली नाही. नियमानुसार बंदुक पोलिसांना उपलब्ध झाल्यावर त्याकरिता गार्डरुमची व्यवस्था पूर्वीच करणे बंधनकारक असते. परंतु ती व्यवस्था येथे नव्हती. त्यामुळे या पोलिसांवर कारवाई कोणत्या नियमानुसार करण्यात आली असा प्रश्न उपस्थित होतो. (तालुका प्रतिनिधी)