शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचारप्रकरणी आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 22:36 IST

शिवणीबांध येथे तीन वर्षापूर्वी घरी स्वयंपाक करीत असलेल्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्ष सश्रम कारवास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. राधेश्याम शहारे (२५) रा.शिवणीबांध असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.

ठळक मुद्देजिल्हा न्यायालयाचा निर्णय : शिवणीबांध येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा/साकोली : शिवणीबांध येथे तीन वर्षापूर्वी घरी स्वयंपाक करीत असलेल्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्ष सश्रम कारवास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. राधेश्याम शहारे (२५) रा.शिवणीबांध असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.शिवणीबांध येथील पीडित महिला १५ जून २०१५ ला सकाळी मजुरीने कामावर जावून दुपारी घरी आली. यावेळी राधेश्याम शहारे याने तुमचा मुलगा घरी आहे का? असे विचारून निघून गेला. सायंकाळी ६ वाजता पीडित महिला स्वयंपाक करीत असताना राधेश्यामने तिच्या घरात प्रवेश करून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पती घरी आल्यानंतर घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.पीडित महिलेच्या तक्रारीवरून भादंवि ३७६ (१) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी तपास अधिकारी दिलीप कुंदोजवार यांनी राधेश्याम शहारेला अटक केली. त्यानंतर आरोपीविरुद्ध पुरावे मिळाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साली यांनी न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद एैकून ५ जून रोजी गुन्ह्याचे स्वरुप व गांभीर्य लक्षात घेऊन राधेश्याम शहारे ७ वर्ष सश्रम कारवास व २ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारवासाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.विश्वास तवले यांनी काम पाहिले.विनयभंग प्रकरणात अडीच वर्षाची शिक्षामोहाडी : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मोहाडी न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.के. साबळे यांनी आरोपी सुमेरसिंग सुखलाल गयगये (४२) रा.खमारी (बुज) याला अडीच वर्षाचा कारावास तसेच पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. २०१५ मध्ये खमारी येथील सुमेरसिंग गयगये याने एका महिलेच्या घरात प्रवेश करून तिचा विनयभंग केला होता. या प्रकरणात मोहाडी पोलिसांनी भादंवि ३५४ (अ), (ब), (ड), ४५२, ५०९ कलमान्वये गुन्हा नोंदविला होता. ठाणेदार जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शन हवालदार चोपराम निर्गुळे, सुनिल कासदा यांनी तपास करून मोहाडी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायाधिशांनी दोन्ही बाजू ऐकून साक्ष व पुराव्याच्या आधारे आरोपींला कलम ३५४ (अ) नुसार एक वर्ष शिक्षा व दोन लाख रुपये दंड, कलम ३५४ (ड) नुसार एक वर्षाची शिक्षा व दोन हजार रुपये दंड, कलम ४४८ नुसार सहा महिने शिक्षा व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शासनाच्यावतीने सरकारी अभियोक्ता विपुल कोकाटे यांनी बाजू मांडली तर हवालदार नामदेव धांडे यांनी पैरवी केली.