शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

वाटमारीच्या प्रयत्नातील सराईत आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:10 IST

राष्ट्रीय महामार्गावरील अंधाराचा फायदा घेत वाटमारीच्या प्रयत्नात असलेल्या दोघांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुस्क्या आवडल्या.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : फरार आरोपीचा शोध सुरू

आॅनलाईन लोकमतभंडारा : राष्ट्रीय महामार्गावरील अंधाराचा फायदा घेत वाटमारीच्या प्रयत्नात असलेल्या दोघांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुस्क्या आवडल्या. यात आरोपींचा एक साथीदार पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. ही कारवाई शुक्रवारच्या रात्री भिलेवाडा ते शिंगोरी दरम्यान केली.दिनेश प्रकाश कुर्वे सोनी (२४) रा. बडा हनुमान मंदिर गोंंदिया, सुरज शिवकुमार तिवारी (२८) रा. रेल्वेस्टेशन गांधी नगर अमरावती असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांचे नाव आहे. या कारवाईदरम्यान गुन्हेगारांचा एक साथीदार पसार झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा ते लाखनी मार्गावर असलेल्या भिलेवाडा ते सिंगोरी दरम्यान एका लाल रंगाची दुचाकी रस्त्याच्या कडेलगत थांबून तीन युवक संशयास्पद स्थितीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांना प्राप्त झाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह राष्ट्रीय महामार्ग गाठला. यावेळी सदर इसम साकोलीकडून येणाºया वाहनांना हात दाखविताना दिसून आले. त्यामुळे या युवकांना पकडण्याचा प्रयत्न केला असता दिनेश कुर्वे सोनी व सुरज तिवारी यांना अटक केली तर अन्य एक साथीदार पसार झाला. या दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून लुटमारीसाठी वापरण्यात येणाºया धारदार साहित्य सापडून आले. या कारवाईत पोलीसांनी एमएच ३५ एम ६३७६ या दुचाकीसह अन्य साहित्य जप्त केले आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश काळे, विनोद रहांगडाले, प्रितीलाल रहांगडाले, बंडू नंदनवार, मंगल कुथे, वामन ठाकरे, रोशन गजभिये, दिनेश आंबेडारे, मोहरकर, स्रेहल गजभिये, चालक हरीदास रामटेके यांनी केली.