शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

जनावरे कोंबून नेणाऱ्या वाहनाला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 23:18 IST

चारचाकी वाहनात कोंबून निर्दयतेने सहा गार्इंना नेणाऱ्या वाहनाचा टायर फुटला. त्यानंतर वाहनचालकाने रस्त्याशेजारी वाहन उभे करून पसार झाला.

ठळक मुद्देयुवकांच्या सतर्कतेने वाचले गार्इंचे प्राण : आंतरराज्यीय गोतस्करांची टोळी सक्रिय

आॅनलाईन लोकमततुमसर : चारचाकी वाहनात कोंबून निर्दयतेने सहा गार्इंना नेणाऱ्या वाहनाचा टायर फुटला. त्यानंतर वाहनचालकाने रस्त्याशेजारी वाहन उभे करून पसार झाला. चार ते पाच तरूणांनी या वाहनाच्या काचा फोडून वाहनातून गार्इंची सुटका केली. हा प्रकार मंगळवारला सकाळी गोबरवाही शिवारात घडला. याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.तुमसर-कटंगी आंतरराज्यीय महामार्गावर मागील काही दिवसांपासून गाय-बैलांची तस्करांची टोळी सक्रिय आहे. मंगळवारी सकाळी ५.३० च्या सुमारास (सीजी १८ डी ७७००) क्रमांकाच्या स्कॉर्पीयो गाडीत सहा गार्इंना पाय व तोंड बांधून निर्दयीपणे कामठी येथे नेले जात होते. टायर फुटल्याने चालकाला वाहन थांबवावे लागले. त्यानंतर तिथून वाहनचालक पसार झाला.गोबरवाही येथील चार ते पाच तरूण सकाळी फिरायला गेले होते. वाहन रस्त्याशेजारी उभे होते. वाहनात काही हालचाल होताना त्यांना दिसली. आत डोकाऊन बघितले असता त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. काचातून बघितले असता त्यांना आत जनावरे दिसली. त्यानंतर वाहनाच्या काचा फोडून जनावरांना बाहेर काढण्यात आले. सहा गायीपैकी दोन गार्इंचे पाय तुटलेले होते. उर्वरित तीन गाई गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या. एका गाईने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. वाहनात वाहन चालकाची एकमेव सीट होती तर उर्वरित सीट काढलेल्या होत्या. बघेडा मार्गाने येथे गार्इंची तस्करी सुरू असून कामठी येथे कत्तलखान्यात गाय व बैलांना नेले जात आहेत.मध्य प्रदेशात जनावरांची तस्करी टोळी सक्रिय आहे. यापूर्वी बैलांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला नाकाडोंगरी येथे पकडण्यात आले होते. यासर्व गायींना चिखला येथील गोसंरक्षण गौशाळेत पाठविण्यात आले. गोबरवाही पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गोबरवाही पोलीस करीत आहे.