शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीवरून नियंत्रण सुटले तरूणाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 22:26 IST

दुचाकीने देव्हाडीहून तुमसरला जाताना वाहनावरून संतुलन सुटल्यामुळे एक तरूण दुचाकीहून खाली पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारला रात्री ७.३० वाजता तुमसर येथील फादर एग्नल शाळेजवळ घडली.

ठळक मुद्देतुमसर येथील घटना : घनश्यामच्या मृत्यूने खाप्यात शोककळा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : दुचाकीने देव्हाडीहून तुमसरला जाताना वाहनावरून संतुलन सुटल्यामुळे एक तरूण दुचाकीहून खाली पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारला रात्री ७.३० वाजता तुमसर येथील फादर एग्नल शाळेजवळ घडली.घनश्याम शामराव भार्वे (३०) रा.महाकाली नगरी खापा असे मृतकाचे नाव आहे. १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका वाहन दोन तास उशिरा आल्याने त्याला वेळेवर उपचार मिळाला नाही त्यातच घनश्यामचा मृत्यू झाला. घनश्याम भावे हा देव्हाडीहून तुमसरला येत असताना फादर एग्नल शाळेजवळ त्याचे दुचाकीवरून संतुलन बिघडले. रस्त्याच्या काठावरुन वाहन स्लीप झाल्यामुळे घनश्याम रस्त्यावर फेकला गेला. त्यात डोक्याला जबर मार लागला.मित्रांनी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेला फोन लावला परंतु फोन लागला नाही. शेवटी खाजगी वाहनाने तुमसर शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले. तिथे उपचार होत नसल्याने भंडारा जिल्हा रूग्णालात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घनश्यामच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.दोन तास उशिरा पोहचली रूग्णवाहिकाअपघात झाला तेव्हा काही युवकानी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेला फोन केला. वारंवार कॉल करुनही प्रतिसाद मिळाला नाही. ही रूग्णवाहिका वेळेवर आली असती तर घनश्यामचा मृत्यू झाला नसता. शासनाने सुरु केलेली १०८ ही सेवा आता उपयोगाची नाही, असा आरोप होऊ लागला आहे.महिनाभरापूर्वी झाले होते लग्नघनश्यामचा लग्न २७ एप्रिल २०१८ ला खापरखेडा येथे झाला. लग्नाला १ महिना १० दिवस झाले आणि त्यातच काळाने त्याच्यावर झडप घातली. घनश्यामच्या पत्नीने टोहा फोडला तेव्हा त्याच्या घरी आलेल्या लोकांचेही डोळे पाणावले होते. घनश्याम हा आधार आणि सेतु केंद्र चालवित होता. त्याच्या मागे वडील, आई, पत्नी, भाऊ वहिणी असा मोठा आप्त परिवार आहे.