शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

फरार आरोपीला चंद्रपुरातून अटक

By admin | Updated: March 15, 2017 00:15 IST

लाखांदूर येथील एका गरीब कुटुंबातील मुलीला पैशाचे प्रलोभन देऊन पाच तरूणांनी सामूहिक अत्याचार केला. यातील चार तरूणांना रविवारला अटक झाली.

प्रकरण अत्याचाराचे : दोघांना पोलीस कोठडी, तिघांची बाल सुधारगृहात रवानगीभंडारा : लाखांदूर येथील एका गरीब कुटुंबातील मुलीला पैशाचे प्रलोभन देऊन पाच तरूणांनी सामूहिक अत्याचार केला. यातील चार तरूणांना रविवारला अटक झाली. फरार सौरभ उपरे याला चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथून रविवारला रात्री अटक करण्यात आली. यातील दोघांची पोलीस कोठडीत तर तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. याप्रकरणात आरोपींचे कपडे, मोबाईल व दुचाकी जप्त करण्यात आली आहे.लाखांदूर येथील पाच तरूणांनी १६ वर्षीय मुलीवर जंगलात नेऊन २५ फेब्रुवारीला सामूहिक अत्याचार केला. दरम्यान त्यांनी अत्याचाराची मोबाईलवर चित्रफित तयार करून नंतर ती सोशल मिडीयावर व्हायरल केली. त्यामुळे या प्रकरणाची वाच्यता झाली. दरम्यान आरोपीकडून पीडित मुलीला व तिच्या कुटुंबियांना धमकी देण्यात आल्यामुळे पीडित भयभीत झाली होती. सदर प्रकरण ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच लाखांदूरचे प्रभारी ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे यांनी या प्रकरणाचे गांभिर्य ओळखून पीडित मुलीचा शोध घेतला. तिच्या तक्रारीवरून पाच तरूणांविरूध्द गुन्हा नोंदवून चार तरूणांना अटक केली. या प्रकरणात इसरार, सलीम, चेतन निनावे, सागर हुकरे यांना अटक केली होती. सौरभ उपरे हा फरार झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील तीन आरोपी हे अल्पवयीन आहेत. दोन १८ वर्षांचे आहेत. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता अल्पवयीन आरोपींची बाल सुधारगृहात तर सागर हुकरे व चेतन निनावे याची १८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. (शहर प्रतिनिधी)अनेकांचे होणार मोबाईल जप्तसामूहिक अत्याचार करून तिची चित्रफित तयार करून या तरूणांनी ती सोशल मिडीयावर व्हायरल केली. या तरूणांनी ज्यांना-ज्यांना ही चित्रफित पाठविली ते व अन्य व्यक्तींकडून आणखी किती मोबाईलवर चित्रफित पाठविली ते सर्व मोबाईलधारक आता चौकशीच्या घेऱ्यात येणार आहेत. या सर्वांचे मोबाईल जप्त करण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. दरम्यान पोलीस कारवाईच्या भीतीने अनेकांनी त्यांच्या मोबाईलमधील चित्रफित ‘डीलिट’ केली आहे.अत्याचारात वापरलेले साहित्य जप्तआरोपींनी सामूहिक अत्याचारासाठी वापरलेल्या दोन दुचाकींना जप्त केल्या आहेत. या दोन दुचाकींमध्ये एमएच ३६ व्ही ८०१ व एमएच ३६ एस ७२२७ या दुचाकींचा समावेश आहे. यासोबत आरोपींनी घटनेच्या दिवशी घातलेले कपडे व त्यांचे मोबाईल जप्त केले आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास करून आरोपींना शिक्षा होण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे. यात आतापर्यंत दुचाकी, कपडे व मोबाईल जप्त केले आहेत. आरोपींच्या मोबाईलमधील चित्रफित ज्या-ज्या मोबाईलवर पोहचली ते सर्व मोबाईल जप्त करण्याच्या दृष्टिने कारवाई करण्यात येत आहे. - सुरेश ढोबळे ,प्रभारी ठाणेदार, लाखांदूर.