शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘युनिव्हर्सल’ कारखान्याला अभय कुणाचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 22:48 IST

तुमसर जवळील युनिव्हर्सल फेरो कारखाना कारखानदाराने मुदत संपल्यानंतरही सुरु केला नाही. महावितरण वीज मंडळाने कारखान्याविरुद्ध खटला दाखल केला. १७ महिने लोटले तरी कारखान्याविरुद्ध ठोस कारवाई राज्य शासनाने केली नाही. मागील तीन वर्षात कारखानदाराने सुमारे २०० कोटीची मॅग्नीज विक्री केली.

ठळक मुद्देअभय योजनेअंतर्गत कराराचा भंग : वीज वितरण कंपनीचा कारखान्याविरुद्ध खटला, मॅग्नीज विक्री सुरुच

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर जवळील युनिव्हर्सल फेरो कारखाना कारखानदाराने मुदत संपल्यानंतरही सुरु केला नाही. महावितरण वीज मंडळाने कारखान्याविरुद्ध खटला दाखल केला. १७ महिने लोटले तरी कारखान्याविरुद्ध ठोस कारवाई राज्य शासनाने केली नाही. मागील तीन वर्षात कारखानदाराने सुमारे २०० कोटीची मॅग्नीज विक्री केली. आजही कारखाना परिसरातून दररोज मॅग्नीज विक्रीकरिता जाणे सुरुच आहे. अभय योजनेअंतर्गत कारखान्याला अभय मिळाले. सध्या येथे शासनाचे अभय मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.तुमसर जवळ माडगी (दे) येथे युनिव्हर्सल फेरो मॅग्नीज शुद्धीकरण कारखाना आहे. मागील १२ वर्षापासून कारखाना बंद आहे. सन २०१४ मध्ये कारखानदाराने ४८ कोटी वीज बिलापोटी भरले. शासनाने अभय योजनेअंतर्गत सदर कारखान्यावरील सुमारे १५० कोटी माफ केले होते. परंतु तीन वर्षात कारखाना सुरु करण्याची अट राज्य शासनाने घालून दिली होती. ३१ मार्च २०१७ पर्यंत कारखाना सुरु करण्याची मर्यादा होती. परंतु कारखानदाराने कारखाना सुरु केला नाही.दि. १४ एप्रिल २०१७ ला महावितरण कंपनीने कारखान्याविरोधात खटला दाखल केला. १७ महिन्यांचा काळ लोटला. परंतु राज्य शासनाने करारनाम्याचा भंग केल्याप्रकरणी ठोस कारवाई केली नाही. दरम्यान सन २०१४ पासून कारखाना परिसरातील मॅग्नीज विक्री करण्यात आली. मॅग्नीज विक्रीतून सुमारे २०० कोटींचा मॅग्नीज आजपावेतो कारखानदाराने विक्री केला. आजही मॅग्नीज विक्री करणे सुरुच आहे. सदर कारखान्यात २७८ कामगार कार्यरत होते. त्यापैकी बऱ्याच कामगदारांनी ले आॅफ घेतले. त्या कामगारांनीही कारखाना सुरु करण्याच्या अटीवर ले आॅफ घेतला होता. येथील १२ कर्मचाºयांचा सर्वोच्च न्यायालयात खटला सुरु आहे. कामगार सुमारे १२ वर्षापासून बेरोजगार आहेत. परंतु काही कामगारांना वार्षीक आठ लक्षाचे उत्पन्न दाखविण्यात आल्याने त्या कामगारांना आयकर विभागाच्या नोटीस प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे कामगारांत येथे असंतोष दिसत आहे. कारखान्याकडे ३०१ एकर शेती पडून आहे. कसदार शेती येथे ओसाड पडली आहे. कारखानदाराने कामगार व अधिकाºयांच्या मुलाकरिता इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु केली होती. ती आजही येथे सुरु आहे. कारखाना बंद झाल्याने कामगार नाहीत. परंतु शाळा मात्र नियमित सुरु आहे. उलट रुग्णालय येथे कायम बंद करण्यात आले हे विशेष. आयकर नोटीस प्राप्त झाल्याने कामगारात खळबळ माजली असून त्याविरोधात पुन्हा न्यायालयात जाण्याची तयारी कामगारांनी सुरु केली आहे. येथील सर्व प्रकरणाची चौकशी राज्य शासनाने सुरु करण्याची गरज आहे. कारखान्यातून मॅग्नीज विक्री राज्य शासनाने रोखण्याकरिता प्रयत्न करण्याची गरज आहे.कारखान्याने कराराचा भंग केला. राज्य शासनाने येथे गंभीर दखल घ्यावी. मॅग्नीज विक्री करणे त्वरीत थांबवावे. कारखानदाराला जाब विचारावा. शेतकºयांच्या जमिनी परत करावे. राज्य शासनाने सदर कारखाना स्वत: चालवावा अथवा त्याचा लिलाव करण्यात यावा.-डॉ.पंकज कारेमोरे, युवा काँग्रेस नेते, तुमसर.