शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अबब..! स्वयंपाक खोलीत दडून होते तब्बल १२ विषारी नाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 13:12 IST

Bhandara News मोहाडी तालुक्यातील मांडेसर येथील किशोर लिल्हारे यांच्या स्वयंपाकघरातून एक दोन नव्हे, तर तब्बल १२ विषारी नाग साप निघाल्याची घटना घडल्याने गावात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देतत्पर मदत मिळाल्यामुळे किशोर लिल्हारे यांच्या कुटुंबियाने सर्पमित्रांचे आभार मानले आहे, मात्र आताही स्वयंपाक खोलीत जाताना त्यांना भीती वाटत आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्क  भंडारा : मोहाडी तालुक्यातील मांडेसर येथील किशोर लिल्हारे यांच्या स्वयंपाकघरातून एक दोन नव्हे, तर तब्बल १२ विषारी नाग साप निघाल्याची घटना घडल्याने गावात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे दृश्य बघण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती.

रात्री ९ वाजेच्यादरम्यान स्वयंपाक खोलीतील एका कोपऱ्यात काहीतरी हालचाल होत असल्याचे जाणवल्याने त्या दिशेने बघितले असता, एक-दोन नागाची पिली असल्याचे दिसल्याने घरातील सर्वच घाबरले. त्वरित सर्पमित्रांना फोन करून बोलाविले असता, सुमारे दोन तास चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशननंतर सर्पमित्रांनी या बाराही सापांना स्वयंपाक खोलीतील वेगवेगळ्या ठिकाणांहून पकडून सुरक्षित ठिकाणी सोडून दिले. तेव्हा कुठे लिल्हारे कुटुंबाच्या जिवात जीव आला व आलेल्या संकटातून त्यांना संरक्षण मिळाले. पावसाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात साप निघण्याच्या घटना खूप जास्त प्रमाणात होतात.

स्वयंपाकघरात साप असल्याची माहिती सर्पमित्र दिनेश गराडे यांना मिळताच त्यांनी त्यांच्या चमूसह घटनास्थळी धाव घेत सापांची शोधाशोध सुरू केली. तेव्हा स्वयंपाक खोलीत एक नव्हे, तर तब्बल १२ विषारी नागाची पिली आढळून आली. बघ्यांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे सर्व साप पकडायला दोन तास लागले.

सर्पमित्र दिनेश गराडे, दीपक नागपुरे, मुन्ना बोरकर यांनी या सापांची नोंद कान्द्री वन विभागात करून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडले. तब्बल १२ विषारी नाग साप निघाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :snakeसाप