शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

मेन्टेनन्सअभावी एबी स्विच वर्षभरापासून सुरूच

By admin | Updated: June 8, 2017 00:24 IST

वीज पुरवठा सुरळीत करताना ११ केव्हीच्या जीवंत वीज तारांना स्पर्श झाल्याने महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली.

वीज वितरण कंपनीचा प्रकार : अपघाताला अधिकारी जबाबदारप्रशांत देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वीज पुरवठा सुरळीत करताना ११ केव्हीच्या जीवंत वीज तारांना स्पर्श झाल्याने महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली. यात तिला उजवा हात गमवावा लागला. या जनित्रावरील वीज पुरवठा बंद करण्याची एबी स्विचची देखभाल दुरूस्ती वर्षभरापासून करण्यात आलेली नसल्याने तो सुरूचं आहे. याकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच हा अपघात घडला असून याला येथील अधिकारी दोषी आहेत.जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर राष्ट्रीय महामार्गावर वीज वितरण कंपनीच्या दक्षिण क्षेत्राचे ०८७००९/२०६/पो९४ वर जनित्र आहे. या जनित्रावर तांत्रिक बिघाड आल्याने तो सुरळीत करताना २९ मे ला संध्या खोब्रागडे ही महिला भाजली. यात तिचा उजवा हात निकामी झाल्याने गमवावा लागला. या गंभीर प्रकरणावर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून आता सावरासावर करण्यात येत आहे. त्यामुळे यातील एक गंभीर बाब आता समोर आली आहे.या जनित्रावरून ११ केव्हीचा विद्युत पुरवठा केल्या जातो. वीज पुरवठा चालूबंद करण्यासाठी येथे एबीस्विच लावलेले आहे. मात्र, एबी स्विचच्या शेवटच्या पॉर्इंटच्या ‘पोस्ट इंसुलेटर’मध्ये स्फोट झाल्याने तो वर्षभरापासून निकामी आहे. त्या पॉर्इंटला ‘जंपर’ करून थेट वीज पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे एबी स्विच बंद केल्यानंतरही वीज पुरवठा सुरू होता. १५ दिवसापूर्वीच दक्षिण क्षेत्रात रुजू झालेल्या संध्या खोब्रागडे या महिला वीज तांत्रिक कर्मचाऱ्याला ही बाब माहित नव्हती. त्यामुळे हा दुर्दैवी प्रसंग घडला.जुलै २०१६ पासून स्विच सुरूवीज पुरवठा बंद करण्यासाठी असलेले एबीस्विच हे निकामी आहे. जुलै २०१६ मध्ये येथील शेवटच्या पॉर्इंटवर स्फोट झाला होता. या रात्री शहरातील विद्युत पुरवठा बंद झाला होता. तो सुरू करण्यासाठी आवश्यक साहित्य वीज कंपनीकडे उपलब्ध नसल्याने वीज पुरवठा सुरळीत करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्याने जंपर करून वीज पुरवठा थेट केला होता. तब्बल ११ महिन्यापासून वीज कंपनीने या गंभीर बाबीची वेळीच दखल घेऊन तो दुरूस्त केला असता, तर संध्याचा अपघात झाला नसता.