शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी लोभी तलावात वाघाचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:04 IST

आष्टी लोभी शिवारातील खाम तलाव शिवारात पट्टेदार वाघ दिसल्याने एकच खळबळ माजली. मंगळवारी सकाळच्या सुमारास शेतकऱ्यांना तलावाजवळ भटकंती करताना तो दिसला. शेतकऱ्यांनी गावाकडे धूम ठोकली. वाघ दिसल्याची माहिती नाकाडोंगरी वनअधिकाऱ्यांना देण्यात आली. वाघावर लक्ष ठेवण्याकरिता नाकाडोंगरी, तुमसर तथा भंडारा येथून रेस्क्यू आॅपरेशन पथक घटनास्थळी दाखल झाले.

ठळक मुद्दे१० तासांपासून ठिय्या : मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात वाघ दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आष्टी लोभी शिवारातील खाम तलाव शिवारात पट्टेदार वाघ दिसल्याने एकच खळबळ माजली. मंगळवारी सकाळच्या सुमारास शेतकऱ्यांना तलावाजवळ भटकंती करताना तो दिसला. शेतकऱ्यांनी गावाकडे धूम ठोकली. वाघ दिसल्याची माहिती नाकाडोंगरी वनअधिकाऱ्यांना देण्यात आली. वाघावर लक्ष ठेवण्याकरिता नाकाडोंगरी, तुमसर तथा भंडारा येथून रेस्क्यू आॅपरेशन पथक घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळपर्यंत वाघ तलाव परिसरातच वावरतांना दिसला.तुमसर तालुक्यातील आष्टी लोभी रस्त्याशेजारी खाम तलाव आहे. तलाव क्षेत्रात पट्टेदार (वयस्क) वाघ गुरुवारी सकाळी शेतकऱ्यांना दिसला. त्यानंतर एकच खळबळ माजली. शेतकºयांनी शेतीचे कामे सोडून घरी परत आले. ही माहिती नाकाडोंगरी येथील वनपरिक्षेत्राधिकारी हितेश धनविजय यांना देण्यात आली. दरम्यान धनविजय यांनी भंडारा येथील मुख्य कार्यालयात दिली. तुमसर, भंडारा येथून वनअधिकारी व कर्मचाºयांचे पथक नाकाडोंगरी येथे दाखल झाले.तलाव परिसरात तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद जोशी, भंडाºयाच्या अधिकारी राऊत, नाकाडोंगरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी हितेश धनविजय इतर कर्मचारी, पोलीस कर्मचारी सकाळी दाखल झाले. तलाव परिसरात पट्टेदार वाघ त्यांना दिसला. मध्यप्रदेशातून तो महाराष्ट्रात दाखल झाला. बावनथडी नदी ओलांडून तो आष्टी तलाव परिसरात दाखल झाल्याने वनपरिक्षेत्रअधिकारी धनविजय यांनी लोकमतला सांगितले. तसा वाघाचा हा कोरीडोर आहे.पट्टेदार वाघ मध्यप्रदेशातून आष्टी, लोभी तलाव परिसरात दाखल झाला आहे. तो जखमी नसल्याने त्याला पकडण्याचे आदेश नाहीत. आम्ही सध्या लोकेशन घेत आहोत. वरिष्ठांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल.- हितेश धनविजयवनपरिक्षेत्राधिकारी नाकाडोंगरीतलाव परिसरात वाघाचा दहा तासापासून ठिय्या आहेत. वनअधिकाऱ्यांनी वाघाला हुसकावून लावणे गरजेचे आहैे. पुन्हा पाण्याच्या शोधात वाघ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाघाच्या भीतीने शेतकरी दिवसभर शेताकडे फिरले नाही.- शिशुपाल गौपाले,पं.स. सदस्य आष्टी