शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
3
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
4
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
5
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
6
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
7
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
8
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
9
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
10
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
11
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
12
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
13
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
14
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
15
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
16
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
17
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
18
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
19
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
20
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम

आंबागडात हुंदके... आक्रोश.. अन् आक्रोश

By admin | Updated: October 24, 2015 02:50 IST

सकाळपासूनच विजयादशमी साजरे करण्याची चाहूल लागली होती. सकाळी गावात घट विसर्जन करण्यात आले.

विजयादशमीवर काळाचा घाला : धीर देणारे झाले होते अधीर, तिन्ही मुलांवर सामूहिक अंत्यसंस्कारमोहर भोयर तुमसर सकाळपासूनच विजयादशमी साजरे करण्याची चाहूल लागली होती. सकाळी गावात घट विसर्जन करण्यात आले. दसऱ्याला लोखंडी साहित्याची पुजा केली जाते. त्यासाठी चार शाळकरी मुले घराजवळच्या तलावात सायकल धुण्यासाठी घरुन निघाले. परंतु अवघ्या तासाभरात तिघांच्या मृत्यूची वार्ता गावात पसरली आणि सर्वत्र आक्रोश अन् हुंदके दिसून आले. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. रावण दहणाचा कार्यक्रम तर झाला नाहीच परंतु आंबागड या छोट्याशा गावात कुणाच्याही घरी रात्री चुली पेटल्या नाहीत.तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगात आंबागड हे तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. गुरुवारला सकाळी ८.३० वाजताच्या सुमारस सुनील वाढीवे (१८), राजकुमार टेकाम (१६), सानिया ठाकरे (१०) व सचिन टेकाम (१६) या शाळकरी मुलांनी सायकल धुण्याचा बेत आखला. त्यासाठी हे चौघेही गावाबाहेरील तलावावर सायकल धुण्याकरिता गेले. त्याच तलावात रवी रहांगडाले हेसुद्धा आपले ट्रॅक्टर धूत होते. आपआपल्या सायकल धुतल्यानंतर ते सायकलने जाण्यापेक्षा ट्रॅक्टरने जाऊ, असे त्या चौघांनीही ठरविले. ट्रॅक्टरचालक रवीने त्यांना घेऊन जाण्यासाठी होकारही दिला. सोबतच्या सायकलस ट्रॅक्टर ट्रॉलीत टाकून चौघेही जण ट्रॉलीत बसले. परतताना आंबागड तलावाच्या वितरीकेवर तितीरमारे शाळेची संरक्षक भिंतीमुळे समोरचे वाहन चालकाला दिसत नव्हते. समोरुन एखादे वाहन येत असल्याचा भास झाल्यामुळे ट्रॅक्टर चालक रवीचे वाहनावरुन नियंत्रण सुटले. अशातच घाबरलेल्या चालकाने ट्रॅक्टरवरुन उडी घेतली. त्यामुळे अनियंत्रीत ट्रॅक्टर ट्रॉलीसह वितरीकेत कोसळला. यावेळी मदतीसाठी या मुलांनी आरडाओरड केली. परंतु, क्षणात सर्व काही संपले. सुनिल वाढीवे व राजकुमार टेकाम यांच्या अंगावर ट्रॅक्टर ट्रॉली कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर सानियाचा तुमसरात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सचिन टेकाम याची प्रकृती चिंताजनक आहे.त्यानंतर आंबागड येथील शेकडो नागरिकांनी तुमसर रुग्णालयात धाव घेतली. चारपैकी तिघे तुळशीराम तितीरमारे शाळेचे तर सानिया ही जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी होती. गुरुवारला सायंकाळी या तिन्ही मुलांवर शोकाकुल वातावरणात सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. आंबागड गावात रावणदहणाचा कार्यक्रम रद्द झाला होता. तिथे केवळ हुंदके आक्रोश अन् आक्रोश दिसत होता. सुनिल हा आईवडिलांना एकुलता होता. त्याच्या आईवडीलांचे हुंदके बघून प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. काळ किती क्रुर असतो, याची प्रचिती येत होती. सानियाच्या आईचे डोळे रडून रडून कोरडे पडले होते. संपूर्ण गाव या तीन कुटूंबाला धीर देत होता. पंरतु धीर देणारेच प्रत्येकजण अधीर झाले होते. मृतदेह पाहून अबोल झाले होते.