शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

अन् विमान प्रवासाने भारावला ‘ओम’

By admin | Updated: June 23, 2017 00:21 IST

सर्वांचाच पहिलाच विमानप्रवास होता. त्यामुळे विद्यार्थ्यांसारखी माझीही विमानात बसण्याची उत्सुकता वाढली होती.

लोकमत संस्कारांचे मोती स्पर्धा : दिल्लीत राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींची घेतली भेट लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : सर्वांचाच पहिलाच विमानप्रवास होता. त्यामुळे विद्यार्थ्यांसारखी माझीही विमानात बसण्याची उत्सुकता वाढली होती. आम्ही नागपूर विमानतळावर पोहोचलो. अवघ्या दीड तासात दिल्लीला पोहोचलो. दिल्लीत भव्यदिव्य विमानतळ पाहून अक्षरश: भारावलो, हे सर्व ‘लोकमत’मुळे शक्य झाल्याची प्रतिक्रिया ओम बैस या विद्यार्थ्याने दिली.लोकमत समूहातर्फे ‘संस्काराचे मोती’ या स्पर्धेतील विजेत्या चिमुकल्यांना नागपूर-दिल्ली-नागपूर अशी हवाई सफर करविण्यात आली. यात सहभागी होऊन परतल्यानंतर ओम बैस या विद्यार्थ्याने प्रवासाचे वर्णन कथन केले. बुधवारला तो परत आल्यानंतर त्याचा साकोली येथील कृष्णमुरारी कटकवार विद्यालयात लोकमत जिल्हा कार्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रसार अधिकारी विजय बन्सोड, साकोली येथील तालुका प्रतिनिधी संजय साठवणे, प्राचार्य विजय देवगिरकर, क्रीडा शिक्षक शाहैद कुरैशी व शिक्षकवृंद उपस्थित होते.नागपूर विभागातील संस्काराचे मोती या स्पर्धेतील विजेते बुधवारी सकाळी ७ वाजता नागपूर विमानतळावरून दिल्लीला विमान प्रवासाला निघाले. सर्वांचाच हा पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. प्रथम हवाई प्रवास असतानासुध्दा उत्साहामुळे कोणाच्याही मनात भीती जाणवत नव्हती. दीड तासाच्या हवाई प्रवासानंतर दिल्ली विमानतळावर आम्ही पोहोचलो. आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भव्यदिव्य रूप पाहून सर्वच विद्यार्थी भारावून गेले. त्यानंतर काही वेळातच गोवा व महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांची एकत्र भेट झाली. येथे दोन्ही राज्यातील विद्यार्थी एकत्र आले. त्यानंतर देशाची राजधानी असलेल्या दिल्ली भेटीच्या प्रवासाला सुरूवात झाली. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी भारतीय रेल्वेच्या म्युझियमला भेट दिली. तेथे त्यांना भारतीय रेल्वेच्या प्रारंभापासून वर्तमानापर्यंत रेल्वेने केलेल्या प्रगतीची माहिती मिळाली. त्याचबरोबर मेट्रो प्रकल्पाचीही माहिती देण्यात आली. इंडिया गेट, राष्ट्रपती भवनाला भेट दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी इंदिरा गांधी स्मृती भवनाला भेट दिली. याप्रसंगाने सर्व विद्यार्थी भारावून गेले. प्रवासात महामहिम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. शालेय जीवनात कोणत्याही उपक्रमातून हवाई सफर घडविण्याची संधी उपलब्ध झालेली नाही. तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला ‘लोकमत’ समूहाने ही संधी उपलब्ध करून दिली, असे सांगत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांनी ‘लोकमत’च्या या उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. ही सर्व अनुभूती आपल्याला स्वप्नवत वाटत होती, अशी प्रतिक्रिया ओम बैस या विद्यार्थ्याने दिली. परतीच्या प्रवासाला सुरूवात झाल्यानंतर दीड तासात विमान नागपूरच्या आकाशात घिरट्या घालू लागले. नागपूरच्या दिशेने उड्डाण करीत पोहोचले, असे ओमने सांगितले. लोकमत समूहातर्फे ओमला मिळालेल्या दिल्ली हवाई सफरीमुळे शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थीत्र व कुटुंबामध्ये आनंद व्यक्त होत आहे लोकमतच्या उपक्रमामुळे त्याला अभूतपूर्व प्रवास करण्याची संधी मिळाली, असे उदगार ओमच्या कुटुंबीयांनी काढले.