शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
4
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
5
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
6
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
7
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! वैभव सूर्यवंशीची झंझावती खेळी, मैदानात पाडला षटकारांचा पाऊस
8
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
9
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
10
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
11
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
12
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
13
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
14
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
15
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
16
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
17
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
18
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
19
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
20
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!

रात्री शेतावर गेलेल्या शेतकऱ्याची वाघाने केली शिकार

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: December 5, 2024 12:58 IST

Bhandara : मोहाडी तालुक्यातील जांब-कांद्री वनपरिक्षेत्र अंतर्गत घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मोहाडी तालुक्यातील जांब-कांद्री वनपरिक्षेत्र अंतर्गत पिटेसूर गावाजवळील वन परिक्षेत्राच्या राखीव वनात रात्री वाघाने शेतकऱ्याला ठार केले. रात्री ११ वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. लक्ष्मण डोमा मोहणकर (५०) असे या शेतकऱ्याचे नाव असून तो पिटेसूर या गावातील रहिवासी आहे.

वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सूवर्ण नियत क्षेत्र (बिट) क्रमांक ५३ राखीव वनात बुधवार, ४ डिसेंबरच्या रात्री रात्री ८ ते ९ दरम्यान ही घटना घडली. मृत शेतकरी लक्ष्मण मोहणकर यांचे या परिसरात शेत असून शेततळेही आहे. रात्री तळ्यावर मच्छी पकडण्यासाठी निघाला होता. मात्र उशिरापर्यंत घरी परत न आल्यामुळे गावकऱ्यांनी रात्री ११ वाजता शेताच्या आणि जंगले परिसरात शोध घेतला. यादरम्यान जंगलात त्याचे शरीर अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत पडून असलेले आढळले. डावा पाय मांडीपासून खाल्लेला होता, गुडघ्याखालचा पायाचा भाग मृतदेहापासून काही अंतरावर पडून असलेला आढळला.गावकऱ्यांनी ही माहिती वन विभागाला दिल्यावर वनविभाागचे अधिकारी आणि पथक घटनास्थळी पोहचले. पहाटे ३ वाजता त्याचे प्रेत मोहाडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले.

मनुष्यहानीची पहिलीच घटना

या परिसरात वाघ असल्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून होती. मात्र मनुष्यहानीची ही पहिलीच घटना आहे. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागिरकांकडून पुढे येत आहे.

टॅग्स :Tigerवाघbhandara-acभंडारा