शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आयुध निर्माणीतील स्फोटप्रकरणी त्री सदस्यीय चौकशी समिती गठीत

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: January 27, 2024 13:59 IST

यतीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भंडारा : जवळच असलेल्या जवाहर नगर येथील आयुध निर्माणीमध्ये शनिवारी सकाळी झालेल्या स्फोटाच्या आणि कामगाराच्या मृत्यूच्या चौकशीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोर्ड चौकशी समिती गठित केली आहे. दरम्यान, मृत कामगार अविनाश मेश्राम यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठविले आहे.

आयुध निर्माणीचे डेप्युटी जनरल मॅनेजर यतीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तातडीने गठित करण्यात आलेल्या बोर्ड कमिटीमध्ये एजीएम मलिक, जॉईंट जीएम पी.व्ही. मडावी आणि जॉईंट वर्कर मॅनेजर पी.पी. गायधने यांचा समावेश आहे. या त्रिसदिशीय समितीने चौकशी सुरू केली असून, त्याचा अहवाल तातडीने वरिष्ठांना दिला जाणार आहे.

यतीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र सकाळी सव्वा आठ वाजता मोठा ब्लास्ट झाला. त्यानंतर आग लागली. ही आग विझवण्यासाठी तातडीने बचाव पथक पोहोचले असता अविनाश मेश्राम गंभीर जखमी अवस्थेत दिसले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी घटनास्थळीस त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून, अहवाल आल्यानंतरच अधिक माहिती कळू शकेल.

मृत कामगार अविनाश मेश्राम यांच्या कुटुंबीयांना तातडीने पेन्शनचा लाभ, कंपन्शन आणि अन्य मदत नियमानुसार दिली जाणार असल्याची माहिती यतीश कुमार यांनी दिली. घटनास्थळ प्रतिबंधित क्षेत्र असून तिथे कोणालाही प्रवेश करण्यास अनुमती नाही. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी आणि जवाहरनगरचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

कामगार वसाहतीत शोककळामागील 2001 पासून अविनाश मेश्राम आयुध निर्माणीमध्ये रुजू झाले होते. ते मूळचे गोंदिया जिल्ह्यातील अदासा येथील आहेत. सध्या ते मिस्त्री (डी बी डब्ल्यू एम सी एम) या पदावर कार्यरत होते. आयुध निर्माणीमध्ये असलेल्या कामगारांच्या वसाहतीमध्येच ते कुटुंबीयांसह राहत होते. कंपनीमध्ये स्फोट होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच वसाहतीमध्ये शोककळा पसरली आहे. शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव कुटुंबीयांना सोपविले जाणार आहे.

टॅग्स :Blastस्फोट